आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२६

समाजातील प्रत्येकानं सकारात्मक विचार करावा: डॉ. संजीव नाईक

ठाण्यात आगरी समाज भवन नक्की होणार!!
 ठाणे (प्रतिनिधी ): आगरी समाजाने आपल्या कार्य कर्तृत्वाने दिप लावला आहे, त्यांची मशाल व्हावी समाजाचं ऋण फेडायचे असेल तर अशा कार्यक्रमांना मोठ्या संख्येने यायला हवं. आजवर आपण खुप पल्ला गाठला आहे. आपणास सांगू इच्छितो की, ठाण्यामध्ये आगरी समाजाचे भवन नक्की होणार अशी याप्रसंगी ग्वाही देतो असे माजी खासदार डॉ. संजीव गणेश नाईक यांनी सहयोग सभागृह ठाणे येथे आगरी समाज मंडळ ठाणे परिसर आयोजित विद्यार्थी गुणगौरव आणि विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल सत्कार समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रतिपादन केले.          प्रारंभी डॉ. संजीव नाईक, डॉ. किरण गावंड, वक्ते करिअर मार्गदर्शक सुहास पाटील,प्रमुख कार्यवाह रमेश गवळी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून सरस्वती पूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात सौ. नेहा गावंड यांनी गणेश वंदना सादर केली.ऍड.के .ए. पाटील यांनी गेली पंचवीस वर्षे सामाजिक कार्यात मंडळ कार्यरत असल्याचे सांगितले. डॉ. संजीव नाईक पुढे म्हणाले की, आगरी भाषेला करारीपणा असून ब्रिटीश कालीन योगदान आहे. जीवाला जीव देणारा समाज अशी ओळख तुम्हाला समाज म्हणून सार्थ अभिमान असला पाहिजे प्रत्येकजणाने आपल्या क्षेत्रात पुढे जाण्याचा सकारात्मक विचार करा असे नमूद केले. 
        यावेळी करिअर मार्गदर्शक सुहास पाटील यांनी आजच्या विद्यार्थ्यांनी गुणवत्ता सिद्ध केली आहे पण काय करावे काय करू नये जे करायचे ते आपल्याला माहित असेल पाहिजे म्हणून अभ्यास हा श्वास आहे इतकंच महत्त्व अभ्यासाला आहे. सवय बदलत नाही तोपर्यंत नक्षीब बदलतं नाही.शेवटी मेहनती शिवाय काही मिळत नाही हे लक्षात घ्यायला हवे असे सांगितले. समारंभाचे अध्यक्ष डॉ. किरण गावंड यांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसाय करा, घरची शेती करा, समाजातील प्रत्येकानं जागृत व्हावं ,परदेशांत जाऊन चाकरी करण्यापेक्षा भारतामध्ये राहून कमी पैसे मिळतील पण पुढे जाल !तसेच आपल्या देशावर आणि आई वडिलांवर प्रेम करा असे नमूद केले.
        यावेळी करिअर मार्गदर्शक अनिल पाटील, अँड आयुषी पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. शैक्षणिक , सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल सर्वश्री डॉ. संजीवजी नाईक, डॉ. प्रकाश शेळके, डॉ. किरणजी गावंड, अँड. हर्षल पाटील, प्रणव गावंड,जेष्ठ लेखक दिवाकर म्हात्रे, विजयराव गावंड, प्रा. विनोद पाटील, भालचंद्र पाटील यांना सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले. समारंभाचे सूत्रसंचालन प्राचार्य नुतन डाकी आणि जगन्नाथ पाटील यांनी मार्मिक शब्दात केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बौद्धजन पंचायत समिती तालुका दापोली मुंबई विभाग कार्यकारिणी बिनविरोध घोषित

मुंबई  (रामदास धो. गमरे):  बौद्धजन पंचायत समिती तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या समितीच्या मुंबई विभाग सभासद आणि रहिवाशांची सर्वसाधारण सभा ...