मुंबई ( रवींद्र मालुसरे ):पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाते. समाजाचे प्रबोधन आणि जनतेचा आवाज बुलंद करणारी वर्तमानपत्रे ही देशाच्या स्वातंत्र्य पूर्वकाळापासून देशाच्या अखंडत्वाचे आणि लोकशाही रक्षणाचे काम निर्भीडपणे करीत आली आहेत.
संपादकीय पानावर निर्भिड व निःस्वार्थीपणे व्यक्त होणाऱ्या वृत्तपत्रलेखकांची प्रातिनिधिक असलेली राज्यस्तरीय संघटना "मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई" ही आमची संस्था २२ ऑगस्ट २०२६ रोजी आपला ७८ वा "वृत्तपत्र लेखक दिन" साजरा करीत आहे. आजपर्यंत संस्थेच्या या वाटचालीत पत्रकारितेतील अनेक मान्यवरांनी संस्थेच्या वाटचालीत महत्वाचे योगदान दिले आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातील निर्भिड व प्रखरतेचा वसा घेऊन गेली अनेक वर्षे सातत्याने प्रकाशित होत असलेल्या दैनिकाचा संस्थेच्या वतीने सन्मान पुरस्कार प्रदान करून गौरव येत आहे.
दादर सार्वजनिक वाचनालय आणि धुरू हॉल ट्रस्ट येथे दिनांक २२ रोजी संध्याकाळी ६ वाजता आयोजित करण्यांत आलेल्या ७८ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि मुक्तपीठचे संपादक तुळशीदास भोईटे यांचे "संविधानचं अधिष्ठान वर्तमानाचं भान" या विषयावर वृत्तपत्र लेखकांच्या समवेत मुक्तचिंतन होणार आहे. यावेळी ऍड मनमोहन चोणकर आणि शिक्षणमहर्षी शिवराम उतेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा