आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २१ ऑगस्ट, २०२६

गुणवंत कामगारांना म्हाडा-सिडकोच्या गृहनिर्माण योजनेत आरक्षण द्या ;राज्य गुणवंत कामगार असोसिएशनची मागणी; मुंबई जिल्हाध्यक्ष प्रभाकर तुकाराम कांबळे यांचा पुढाकार

मुंबई : राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने म्हाडा व सिडकोच्या गृहनिर्माण योजनांमध्ये गुणवंत कामगारांसाठी स्वतंत्र आरक्षणाची तरतूद करण्यात यावी, अशी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली आहे. असोसिएशनचे मुंबई जिल्हाध्यक्ष प्रभाकर तुकाराम कांबळे यांनी ही मागणी शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.
     राज्याच्या सामाजिक, औद्योगिक आणि आर्थिक विकासात गुणवंत कामगारांचे योगदान मोठे आहे. विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरी करून समाज व राज्याच्या प्रगतीला हातभार लावणाऱ्या कामगारांना त्यांच्या कार्याची योग्य दखल घेत सन्मान आणि प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. मात्र, अनेक गुणवंत कामगारांना मुंबई व उपनगरांमध्ये परवडणारी घरे मिळविण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे असोसिएशनने नमूद केले आहे.
     मुंबई महानगर परिसरातील वाढती घरांच्या किमती, मर्यादित उत्पन्न आणि वाढता जीवनावश्यक खर्च लक्षात घेता गुणवंत कामगारांसाठी म्हाडा व सिडकोच्या गृहनिर्माण योजनांमध्ये स्वतंत्र कोटा किंवा आरक्षण उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी कांबळे यांनी केली आहे. या माध्यमातून अनेक कष्टकरी आणि गुणवंत कामगारांना स्वतःचे हक्काचे घर मिळण्याचे स्वप्न साकार होऊ शकते.
    गुणवंत कामगारांनी आपल्या कार्यक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय योगदानाचा विचार करून त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमध्ये प्राधान्य मिळावे. त्याचप्रमाणे म्हाडा व सिडकोच्या घरांच्या सोडतीमध्ये गुणवंत कामगारांसाठी स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करून त्यांना न्याय द्यावा, अशी भूमिका राज्य गुणवंत कामगार असोसिएशन च्या माध्यमातून मुंबई जिल्हाध्यक्ष प्रभाकर तुकाराम कांबळे यांनी आपल्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

" कुंकुमार्चन " सोहळ्याचे आयोजन

मुंबई : मराठमोळं मुलुंड ही संस्था सातत्याने मुलुंडमधील मराठी परंपरा व संस्कृती जपण्याचे कार्य करत आहे. त्याचाच एक भाग म्हणुन रविवार दिनांक २...