अलिबाग प्रतिनिधी - दिनेश तुरे यांजकडुन :- आपणांस कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे , मुक्काम -उसर, तालुका -अलिबाग , जिल्हा - रायगड येथील मनमिळावू व प्रेमळ स्वभावाचे दानशूर व अध्यातत्मिक सेवेची विलक्षण आवड असणारे व्यक्तिमत्व कै. रामदास बाळू शिंदे यांचे अल्पशा आजाराने सोमवार दिनांक-17-08-2026 रोजी कामोठे येथील एम. जी. एम रुग्णालयात वृद्धापकाळाने अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात-शिंदे परिवार, आप्तेष्ट-नातेवाईक , सगे-सोयरे,जावई, पुतणे,भाचे, नंदा ,बहीण, भाऊ, असा विशाल परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी समयी उसर स्मशानभूमीत पंचक्रोशीतील सामाजिक -राजकीय व अध्यातत्मिक क्षेत्रातील विशाल जनसमुदाय मोठ्या संख्येने त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यास उपस्थित होता , हीच त्यांनी आयुष्यभर केलेल्या समाजसेवेची पोहोचपावती होय . त्यांच्या अकस्मात निधनाने उसर गाव शोकसागरात बुडाला आहे. सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा हिरा आज विसावला होता, याची कल्पनाच करता येत नव्हती हा मोठा आघात आहे. यासमयी अश्रूंचा बांध फुटला सर्वजण दुःखाच्या खाईत लोटले गेले, हीच त्यांनी आयुष्यात कमावलेली संपत्ती होय. स्पष्ट व निर्भीडपणे आपले मत व्यक्त करणे हा त्यांचा स्वाभाव होता. आयुष्यभर त्यांनी मनाची श्रीमंती जपली होती. गावच्या भजन मंडळात व नाटकांत त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा . त्यामुळे त्यांच्या अकस्मात निघून जाण्याने विभागातून शोकसंदेश व्यक्त होत आहे. सर्वांच्या सुख -दुःखात ते आवर्जून सहभागी व्हायचे , त्यामुळेच परमेश्वराने प्रेमळ -मायेचा झरा , तसेच प्रेमळ मायेचा आधारस्तंभ आमच्या सर्वांन पासून हिरावून घेतला आहे .
उसर गावच्या सामाजिक कार्यात नवरात्र उत्सव , गावदेवी व गणपती उत्सव , दहीहंडी व इतर कार्यक्रमात त्यांचे मोलाचे योगदान असायचे, त्यांच्या अकस्मात निधनाने गावासाठी योगदान देणारा अनमोल हिरा आज हरपला आहे .त्यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही.
मामा, शून्यातून विश्व निर्माण करून , माया - प्रीत देउनी अमर जाहला आज तुम्ही या जीवनी, हे परमेश्वरा त्यांच्या कुटुंबीयांना या महाकठीण दुःखातून सावरण्याची शक्ती दे , शक्ती दे , मामा ,आता फक्त राहिल्या प्रेमळ व मायेच्या आठवणी व त्या आठवणीने सर्वांचा कंठ दाटून येत आहे , तुमचे कार्य -कर्तृत्व व समाजासाठी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील व आपले उणीव सदैव जाणवणार ,आपल्या कार्य व कर्तृत्वाचा सुगंध हा सदैव दरवळत राहणार !
समाजसेवक कै. रामदास बाळू शिंदे यांचे दिवसकार्य मंगळवार दिनांक 25-08-2026 रोजी त्यांच्या उसर येथील राहत्या निवासस्थानी सकाळी ९ .०० वाजता होणार आहे ,असे शिंदे कुटुंबीयांतर्फे कळविण्यात आले आहे . मामा आपणांस भावपूर्ण श्रध्दांजली व आपल्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन, आपली आठवण सदैव स्मरणात राहील. आपल्या मृतात्म्यास चिरशांती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा