प्रतिनिधी : वसई तालुक्यातील तुंगारेश्वर पर्वतराजीत वसलेल्या तीर्थक्षेत्र परशुरामकुंड येथे वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी आपल्या घरादाराचा त्याग करुन ध्यान धारणेसाठी गेलेल्या बालयोगी श्री सदानंद महाराजांना श्रावण पौर्णिमा (रक्षाबंधन) शुक्रवार दि. २८ ऑगस्ट २०२६ रोजी ६८ वर्षे पुर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने आश्रम संस्थेने गुरुवार दि. २७ ऑगस्ट २०२६ रोजी रात्रौ १०.०० ते १२.०० ह.भ.प. श्री. नितिन महाराज वेंदे (काल्हेर, भिवंडी) यांचा किर्तनाचा कार्यक्रम आश्रमात परशुरामकुंड येथे आयोजित केला आहे. तद्नंतर रात्रौ १२.०० ते ३.०० वाजेपर्यत सामुदायिक हरिभजन होणार आहे.
शुक्रवार २८ ऑगस्ट पहाटे ३.१० वा. महाराजांचा जन्मोत्सव संपन्न होणार आहे. सकाळी ९.०० ते १०.०० वाजेपर्यत रक्षाबंधन तद्नंतर सकाळी १०.०० ते ११.४५ वा ह.भ.प.श्री. नामदेव महाराज भोईर (बालकुम, ठाणे) यांचे श्रवणीय किर्तन होणार असून, १२.०० नित्याची आरती, आरतीनंतर सर्व भक्तांना महाप्रसाद दिला जाणार आहे.
तरी भाविकांनी जन्मोत्सव, भजन,कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री. गुरुनाथ भोईर यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा