आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२६

इंडियन कॉपीराइट प्रोटेक्शनचे मुख्य तपासी अधिकारी जीतू गुप्ता यांनी केला वृद्धाश्रमातील गरजू नागरिकांसाठी आवश्यक औषधांचा पुरवठा

गडब (अवंतिका म्हात्रे): स्वागतम वृद्धाश्रम सामाजिक संस्था, बेलापूर येथे आज दिनांक १६ ऑगस्ट रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी इंडियन कॉपीराइट प्रोटेक्शनचे मुख्य तपासी अधिकारी जीतू गुप्ता सर यांनी वृद्धाश्रमातील गरजू नागरिकांसाठी आवश्यक औषधांचा पुरवठा केला.
     या सामाजिक उपक्रमाला समाजसेविका राजकुमारी गुप्ता मॅडम, दिपाली पाटील मॅडम, कुसुम चोभे मॅडम, बबली पांडे मॅडम तसेच कृष्णा मराठे यांची उपस्थिती लाभली.
      ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी करण्यात आलेल्या या मदतीबद्दल वृद्धाश्रम प्रशासनाकडून जीतू गुप्ता यांचे आभार व्यक्त करण्यात आले. समाजातील गरजू घटकांसाठी अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्याची गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बौद्धजन पंचायत समिती तालुका दापोली मुंबई विभाग कार्यकारिणी बिनविरोध घोषित

मुंबई  (रामदास धो. गमरे):  बौद्धजन पंचायत समिती तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या समितीच्या मुंबई विभाग सभासद आणि रहिवाशांची सर्वसाधारण सभा ...