आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १४ जुलै, २०२६

स्वाभिमान लेखणी पुरस्काराने समाजसेवक यशवंत विठ्ठल खोपकर यांचा गौरव

मुंबई (शांताराम गुडेकर ):  समाजकारण, जनसेवा आणि सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने कार्य करणारे मुख्य मानकरी तथा समाजसेवक श्री. यशवंत विठ्ठल खोपकर यांना आर्यारवी एंटरटेनमेंट आयोजित प्रतिष्ठेचा 'स्वाभिमान लेखणी' पुरस्कार – २०२६ प्रदान करून गौरविण्यात आले.
          दादर (पूर्व) येथील सुरेंद्र गावसकर हॉल, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय येथे आयोजित भव्य पुरस्कार सोहळ्यात विविध क्षेत्रातील पत्रकार, साहित्यिक, संपादक, कलाकार, समाजसेवक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला.
         आर्यारवी एंटरटेनमेंटचे आयोजक सन्माननीय श्री. महेश्वर भिकाजी तेटांबे यांच्या हस्ते श्री. यशवंत विठ्ठल खोपकर यांना मानचिन्ह, सन्मानपत्र व शाल देऊन गौरविण्यात आले. समाजहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे आयोजकांनी नमूद केले.
          श्री. यशवंत खोपकर हे शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष, घाटकोपर पश्चिम विधानसभा संघटक तसेच "मायेची सावली – एक हात कर्तव्यातचा" या सामाजिक परिवाराचे संस्थापक आहेत. गरजू नागरिकांना मदत, रुग्णसेवा, शैक्षणिक सहाय्य, सामाजिक उपक्रम आणि जनहिताच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने केलेल्या निस्वार्थ कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या सन्मानामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
                  पुरस्कार स्वीकारल्यानंतर श्री.यशवंत विठ्ठल खोपकर यांनी हा सन्मान आपल्या कुटुंबीयांना, सहकाऱ्यांना, मित्रपरिवाराला तसेच सामाजिक कार्यात खंबीर साथ देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना समर्पित असल्याची भावना व्यक्त केली. भविष्यातही अधिक जोमाने समाजसेवा करत जनतेच्या प्रश्नांसाठी कार्यरत राहण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रसारक श्री.अनंत पवार हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी विविध सामाजिक, राजकीय, पत्रकारिता आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी श्री. यशवंत विठ्ठल खोपकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मुंबईकरांच्या पाण्यासाठी जागतिक दर्जाचे अभयारण्य उध्वस्त करू नका : शिवक्रांतीचे अध्यक्ष शरद पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

ठाणे :  पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यामधे मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी गारगाई धरण बांधण्याच्या हालचाली मोठ्या प्रमाणावर वेग घे...