आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ७ जुलै, २०२६

गोकूळधाम - यशोधाम लायन्स मेगा मेडिकल कॅम्प उत्साहात संपन्न

मुंबई : लायन्स क्लब मुंबई गोकुळ धाम - यशोधाम यांच्या वतीने मेगा मेडिकल कॅम्प नुकताच गोरेगाव (पूर्व), न्यू म्हाडा कॉम्प्लेक्स सोसायटी नंबर १९ येथे, वर्षातील पहिले वैद्यकीय शिबिर अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले.
    शिबिरात रक्तातील साखरेची तपासणी, बॉडी मास इंडेक्स (BMI) मोजणी, रक्तदाब तपासणी तसेच स्तन कर्करोग तपासणी अशा मोफत निदान सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. ५० हून अधिक नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेतला. त्यामध्ये ३३ महिलांनी स्तन कर्करोग तपासणी करून घेतली.
     शिबिराचे उद्घाटन - उपजिल्हा राज्यपाल (1st VDG) लायन विकास सराफ यांच्या हस्ते झाले. शिबिराचे उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन डॉ. गायत्री पांडव (डीसी डायबेटीस), डॉ. उमेश जोशी (जीएफए ह्युमॅनिटेरियन), डॉ. किशोर पांडव आणि लायन्स क्लब चे अध्यक्ष लायन सुभोध गोखले यांनी केले. झोन चेअरपर्सन आदित्य शेट्टी उपस्थित होते.
     मुसळधार पावसाची परिस्थिती असूनही ज्येष्ठ चार्टर सदस्य प्रा. पाटील तसेच लायन संगीता भुतानी, लायन ज्योती कुलकर्णी, लायन उर्मिल वर्मा आणि लायन मोहन राव यांनी उपस्थित राहून शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.विशेष ज्येष्ठ समाजसेवक संदीप राजपुरकर यांनी सहकार्य केले
       या उपक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा नव्या लायन वर्षाची एक उत्तम सुरुवात ठरली आहे. याच प्रेरणेने वर्षभरात अशा १० हून अधिक वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्याचा संकल्प आहे, व समाजसेवेचे कार्य अधिक व्यापकपणे करता येईल असे डॉ. गायत्री पांडव यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गोकूळधाम - यशोधाम लायन्स मेगा मेडिकल कॅम्प उत्साहात संपन्न

मुंबई : लायन्स क्लब मुंबई गोकुळ धाम - यशोधाम यांच्या वतीने मेगा मेडिकल कॅम्प नुकताच गोरेगाव (पूर्व), न्यू म्हाडा कॉम्प्लेक्स सो...