मुंबई : धर्माचे रक्षण व समाजाचे संघटन या मुख्य हेतूने, मालाड पूर्व येथील एकता हिंदू समितीच्या वतीने, हिंदू महा संमेलनाचे आयोजन , शीला रहेजा मार्ग, रहेजा गार्डन बाहेर, गोरेगाव पूर्व येथे आयोजित करण्यात आले होते. व्यासपीठावर एकता हिंदू समितीचे अध्यक्ष - सुरजीत सिहं नैन एअर फोर्स चे सेवानिवृत्व कमांडर - डॉ. अलोकचंद्र व हिंदू जागरण मंच चे कार्यकारिणी सदस्य - उमेश गायकवाड व्यासपीठावर उपस्थित होते.
संमेलनांची सुरुवात शिल्पा शेट्टी यांच्या गणेश वंदनाने झाली. नंतर बुद्ध वंदना, भारतमाता आरती, अथर्व शीर्ष, हनुमान चालीसा, विविध गीते, कविता, अफझल खान वध.. पोवाडा, देशभक्ती कविता, कराटे प्रदर्शन, शस्त्र प्रत्येक्षित, संकल्प ज्येष्ठ महिला भजन, आदीचे छानदार आयोजन करण्यात आले होते.
हिंदू जागरण मंच चे सदस्य - उमेश गायकवाड यांनी उपस्थित प्रेक्षकाना मार्गदर्शन केले. त्यांनी सर्व हिंदूंनी,संघटित व्हा, जागृत रहा, राष्ट्र व धर्माचे रक्षण करण्यास सज्ज व्हा. नागरी संविधानचे पालन करण्याचा संदेश दिला.संस्थेचे अध्यक्ष - सुरजीत सिहं नैन यांनी उपस्थित पाहुण्याचे स्वागत करून तुलसीचे रोप देऊन सन्मानीत करण्यात आहे.
सूत्रसंचालन - स्वप्नाली गोखले यांनी केले. संकल्प, रहेजा व स्काय व्हील व नागरी निवारा परिसरातील असंख्य रहिवाशी उपस्थित होते. संमेलनात विविध स्टॉल लावण्यात आले होते. एकता हिंदू समितीचे पदाधिकारी,सदस्य यांनी फारच मेहनत घेतली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा