पेण ( प्रतिनिधी)पेण तालुक्यातील गडब -काराव गावातील निर्भीड पत्रकार व साप्ताहिक 'रायगडची शान' चे संपादक सुरेश सीताराम म्हात्रे यांचे दिनांक ७ मे रोजी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी (पत्रकार व राष्ट्रवादी काँग्रेस पेण तालुका सचिव ) अवंतिका म्हात्रे, दोन मुली एक मुलगा व इतर नातलग असा परिवार आहे.
शब्दांची लेखणी विसावली, विचारांचा सूर्य मावळला...
सुरेश म्हात्रे यांची एक निर्भीड पत्रकार, सच्चा विचारवंत अशी ओळख होती.
त्यांनी आपल्या लेखणीतून केवल बातम्या लिहिल्या नाहीत, तर समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला . समाजातील अन्यायाविरुद्ध त्यांची लेखणी तलवारीपेक्षा धारदार होती. जनतेच्या समस्या शासन -प्रशासन दरबारी पोहचवून प्रत्येक समाज घटकाला न्याय द्यायचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न राहिला . सत्यासाठी लढणारा, सर्वसामान्यांच्या वेदनेला वाचा फोडणारा तो आवाज आज कायमचा शांत झाला आहे.
त्यांचा उत्तरकार्य विधी- दशक्रिया विधी शनिवार दि. १६ मे रोजी उद्धर -पाली येथे होईल.तर तेरावा विधी मंगळवार दि. १९ मे रोजी राहत्या घरी गडब, काराव पेण येथे होईल असे त्यांच्या कुटुंबियांकडून कळविण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा