मुंबई : प्रा. जयवंत पाटील यांना सर्वोत्कृष्ट वृत्तपत्र लेखनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबईच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त वृत्तपत्र लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. प्रा. जयवंत पाटील यांच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या " सर्वोत्कृष्ट पत्राची "(पाचवा क्रमांक) निवड करण्यात आली. प्रा . पाटील हे गेली ४५ वर्षे वृत्तपत्र लेखन करीत आहेत. त्यांची आतापर्यंत २००० पत्रं विविध वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना वृत्तपत्रलेखनासाठी आतापर्यंत १०० हून पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या प्रसंगी मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे माजी अध्यक्ष व जेष्ठ वृत्तपत्र लेखक मधु शिरोडकर यांच्या 'कालप्रवाह' या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा मामा काणे हाॅटेल सभागृह, दादर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तसेच यावेळी निर्भीड जागल्या पुरस्कार काही वृत्तपत्र लेखकांना करण्यात आला. या प्रसंगी पद्मश्री उदय देशपांडे, दै.नवशक्तीचे संपादक प्रकाश सावंत, माजी संपादक प्रकाश कुलकर्णी, पत्रकार अशोक बेंडखळे, संघाचे अध्यक्ष रविंद्र मालुसरे आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच निर्भीड जागल्या पुरस्कार काही वृत्तपत्र लेखकांना करण्यात आला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रा. जयवंत पाटील यांना सर्वोत्कृष्ट वृत्तपत्र लेखनाचा पुरस्कार
मुंबई : प्रा. जयवंत पाटील यांना सर्वोत्कृष्ट वृत्तपत्र लेखनाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठी वृत्तपत्र लेखक संघ, मुंबईच्या...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा