गुरुवार, २३ एप्रिल, २०२६
आबलोलीच्या सरपंच सौ.वैष्णवी वैभव नेटके राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित ; भारत सन्मान पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सत्कार!!
कल्याण(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) गुहागर तालुक्यातील आबलोली या ग्रामीण भागात शासनाच्या योजना आणून आपल्या विभागाचा सार्वांगिण विकास करणे हा ध्यास, आपल्या विभागातील जनतेला सुखसोयी उपलब्ध करून देणे, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्याची मोहोर उमटवणाऱ्या आबलोलीच्या सरपंच सौ.वैष्णवी वैभव नेटके.त्यांच्या या चतुरस्त्र कार्याची दखल इंडियन काॅपीराईट प्रोटेक्शन(ॲंन्टी पायरेसी सेल) मुंबई या संस्थेने घेतली.कल्याण येथील के.एम.अग्रवाल काॅलेज एसी ऑडिटेरियम भारत सन्मान पुरस्कार सोहळ्यात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सौ.वैष्णवी वैभव नेटके यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार प्रमुख पाहुण्या इंडियन एअर फोर्सच्या फ्लाइंग ऑफिसर इतिशा चौहान आणि अभिनेत्री ए-स्टार टूर्स अँन्ड ट्रॅव्हल्स च्या संस्थापिका अश्विनी अमित चुरी यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.वैष्णवी नेटके यांनी सरपंच म्हणून यशस्वीपणे कारकीर्द गाजवली आहे, अजूनही कार्यरत आहेत.त्यांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना,सरकारमान्य, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, विविध संस्थांकडून पुरस्कार प्राप्त झाले आहेत.कल्याण येथील या पुरस्कार सोहळ्यात सौ.वैष्णवी नेटके यांचे कुटुंबीयही सहभागी झाले होते.आबलोली सरपंच तसेच सामाजिक कार्यकर्ती म्हणून र्सौ.वैष्णवी नेटके सर्वत्र पंचक्रोशीत परिचित आहेत.सौ.वैष्णवी नेटके यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आबलोलीच्या सरपंच सौ.वैष्णवी वैभव नेटके राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित ; भारत सन्मान पुरस्कार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सत्कार!!
कल्याण(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) गुहागर तालुक्यातील आबलोली या ग्रामीण भागात शासनाच्या योजना आणून आपल्या विभागाचा सार्वांगिण विक...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा