आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २७ एप्रिल, २०२६

पंचशील माता रमाई सेवा संघाच्या वतीने कळंबोली येथे आंबेडकर जयंती साजरी!

प्रतिनिधी : परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सवाचे आयोजन रविवार दि. १९/०४/२०२६ रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यक्रम दोन सत्रामध्ये साजरा करण्यात आला. प्रथम सत्रात वंदनीय भंते महेंद्र बोधीथेरो यांनी बुद्ध साधना घेतली तसेच महामानवांच्या कामाचे, त्यागाचे, परिश्रमाचे, विवेचन अनेक सदस्यांनी आपले विचार मांडले. तसेच मुख्य वक्ते आयु. नितीन घोलप, संभाजी नगर यांनी संविधान, इतर समाज, महिला आणि देशासाठी बाबासाहेबांनी दिलेल्या योगदानाचे उदाहरणासहित आपले मनोगत व्यक्त केले.
      द्वितिय सत्रात सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनी महामानवांना वंदन केले. या कार्यक्रमाला स्थानिक नगरसेवक बबन मुकादम, रामदास शेवाळे आणि बबन बारगजे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आयु. प्रकाश कांबळे यांनी पाहिले. 
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील गायकवाड यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयु. जे. जे. सावंत, आयु. आनंदा जाधव, आयु. विजय मोहिते, आयु. दिपक शिंदे, कु. कमलेश कांबळे आणि महिला मंडळ यांचे योगदान मोलाचे होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ग्लोबल खान्देश महोत्सव 2026 ला जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद; सांगता समारंभ उत्साहात संपन्न!

कल्याण :(प्रतिनिधी - सुनिल इंगळे ) उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ आयोजित ग्लोबल खान्देश महोत्सव 2026 ला जनतेचा अभूतपूर्व प्...