आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २८ एप्रिल, २०२६

ग्लोबल खान्देश महोत्सव 2026 ला जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद; सांगता समारंभ उत्साहात संपन्न!

कल्याण :(प्रतिनिधी - सुनिल इंगळे ) उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ आयोजित ग्लोबल खान्देश महोत्सव 2026 ला जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. रविवार, दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी महोत्सवाचा सांगता समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पाच दिवस चाललेल्या या भव्य महोत्सवाला सुमारे दीड ते दोन लाख नागरिकांनी भेट देत खान्देशी कला, संस्कृती आणि खाद्यपरंपरेचा मनसोक्त आनंद घेतला.
“पाचवे पुष्प अर्पितो, सांगता समारोपाचा क्षण,
खान्देशी रंग-गंधात न्हाला आजचा हा सोहळा पूर्ण,
अहिराणी मायेने जोडली हृदये साऱ्या जनांची,
पुन्हा भेटुयात निरोप आनंदाचा.”
महोत्सवाला माजी पंचायत राज राज्यमंत्री मा. श्री. कपिल पाटील, कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार मा. श्री. निरंजन डावखरे, कल्याण पूर्वच्या माजी आमदार सौ. सुलभाताई गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली.
       यावर्षीचा “खान्देश भूषण” पुरस्कार श्री. प्रवीण माळी यांना प्रदान करण्यात आला, तर “खान्देश उद्योग रत्न” पुरस्कार श्री. सुनील चौधरी यांना देऊन गौरविण्यात आले. तसेच श्री. प्रदीप अहिरे, श्री. राहुल गांगुर्डे, कुमारी श्रद्धा महिरे, पी. गणेश, डॉ. कमलकांत वडेलकर आदींना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
सांगता समारंभाला कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार मा. श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, कल्याण पश्चिमचे माजी आमदार मा. श्री. नरेंद्र पवार, तसेच नगरसेवक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली.
महोत्सवात खान्देशी खाद्यपदार्थ, पारंपरिक कला, लोकसंस्कृती आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी अनुभवायला मिळाली. या उपक्रमामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाली असून गृहउद्योजक व स्टॉलधारकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. “या महोत्सवामुळे स्थानिक उद्योजकांना मोठा आधार मिळाला,” असे मंडळाचे अध्यक्ष श्री. विकास पाटील यांनी सांगितले. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनामध्ये स्वागताध्यक्ष श्री. उमेश बोरगावकर यांनी प्रभावी नेतृत्व करत उत्कृष्ट नियोजन केले. उपाध्यक्ष श्री. प्रदीप अहिरे, श्री. एल. आर. पाटील, श्री. दिगंबर बेंडाळे श्री प्रकाश माळी श्री एस एन पाटील यांनीही आपापल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या.
       स्टॉल विभागाचे नियोजन कोषाध्यक्ष श्री. ए. जी. पाटील यांच्यासह श्री. मिलिंद बागुल, श्री. विनायक संन्याशी, श्री. किशोर पाटील, श्री. डी. व्ही. नाना, श्री. संजय बिलाले यांनी कुशलतेने हाताळले. व्यवस्थापनात श्री. सुभाष सरोदे, श्री एन एम भामरे,श्री. सुनील पाटील, श्री. शरद शिंदे, श्री. प्रवीण सनेर, श्री. अनिरुद्ध चव्हाण, श्री. सुनील इंगळे,सौ. वैशाली पाटील, सौ. उज्वला पाटील, सौ. विद्या अहिरे, सौ कमल पाटील, सो नलिनी पाटील यांनी मोलाचे योगदान दिले.
सांस्कृतिक समितीतील सौ. सुनीता बोरसे, सौ. चेतना भालेराव, श्री. प्रकाश माळी, श्री. रविंद्र शिंपी, श्री. ठाणसिंग पाटील, श्री. विजय पाटील, श्रीरंग अत्रे, आशा वाडीले, योगिता सोनवणे, वैदेही पाटील, नाना पाटील, रतिलाल कोळी यांनी विविध कार्यक्रमांचे उत्कृष्ट सादरीकरण घडवून आणले. सूत्रसंचालनाची धुरा श्री. विनोद शेलकर व सौ. वर्षा पाटील यांनी खुमासदार शैलीत सांभाळली.
एकूणच, ग्लोबल खान्देश महोत्सव 2026 हा खान्देशी संस्कृतीचा जागर करत सामाजिक एकात्मता वृद्धिंगत करणारा आणि स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देणारा भव्य-दिव्य सोहळा ठरला. भविष्यातही अशाच भव्य उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ग्लोबल खान्देश महोत्सव 2026 ला जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद; सांगता समारंभ उत्साहात संपन्न!

कल्याण :(प्रतिनिधी - सुनिल इंगळे ) उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ आयोजित ग्लोबल खान्देश महोत्सव 2026 ला जनतेचा अभूतपूर्व प्...