आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २७ एप्रिल, २०२६

राज्य लॉटरी आमच्या हक्कांची ; नाही राजश्रीच्या बापाची !पेपर लॉटरीच्या आडून ऑनलाईन; ' राजश्री ' विक्री बंदीचा विक्रेत्यांचा निर्णय!

मुंबई दि.(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)राजश्री पेपर लॉटरीच्या आडून यंत्रणा राबविणाऱ्या ' राजश्री बुक माय लॉटरीवर येत्या आठवड्या भरात विक्रेते बंदी आणणार असून कंपनीने विक्रेते, वितरक यांना बेकार करण्याचे षडयंत्र रचले आहे.असे स्पष्ट करून नियमबाह्य यंत्रणा चालविणाऱ्या ' राजश्री चा निषेध व्यक्त केला. राज्य लॉटरी आमच्या हक्कांची ; नाही राजश्रीच्या बापाची! काही घोषणा लक्ष वेधून घेत होत्या!
राजश्री पेपर लॉटरी आडून ' बुक माय राजश्री या ऑनलाईन लॉटरीची यंत्रणा बेकायदा चालविणाऱ्या सेरेनिटी ट्रेडर्स कंपनीने येत्या आठवडयात हा प्रकार बंद करावा अन्यथा उभ्या महाराष्ट्रभरात राजश्री पेपर लॉटरीवर लॉटरी विक्रेते हे 'विक्री बंद'चे हत्यार उचलून बहिष्कार घालतील, असा सज्जड इशारा लॉटरी विक्रेत्यांचे तडफदार नेते श्री. विलास कृ.सातार्डेकर यांनी दिला .विक्रेते, वितरक यांच्या न्याय हक्कांसाठी आता आंदोलन अधिक उग्र करण्याचीही मनोदय त्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र लॉटरी विक्रेता संघटनेने शुक्रवारी सकाळी विक्रोळी येथील सेरेनिटी ट्रेडर्स या कंपनीच्या कार्यालयात धडक दिली आणि 'बुक माय राजश्री 'चे कामकाज बंद पाडले. मुंबई शहर आणि उपनगरातील हजारो लॉटरी विक्रेत्यांनी घोषणांनी सारा परिसर दुमदुमून टाकला . राज्य लॉटरी आमच्या हक्कांची; नाही ' राजश्री' च्या बापाची! असा दणका दिला.यात अंध,अपंग, विधवा, वयोवृद्ध, बेरोजगार, महिला यांनी ऑनलाईन राजश्री लॉटरीच्या निषेधाने फलकही फडकावला ! यावेळी संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष सातार्डेकर यांनी विक्रेत्यांच्या उग्र भावना मांडल्या आणि कंपनीला जाब विचारला.

 ऑनलाईन राजश्रीची विक्री करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केवळ टोलवा टोलवीची उत्तरे दिली. सारं काही कायदेशीर चालू आहे,असे प्रियेश शाह,जयेश माणिक,मयूर लखानी,शरद जाधव यांनी कंपनीतर्फे शिष्टमंडळाला सांगितले . गेली अनेक महिने पत्रव्यवहार व प्रत्यक्ष भेटीतून कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही .त्यात अजून दिरंगाई ही संतापजनक आहे ! असेही सातार्डेकर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
प्रामाणिकपणे राज्य लॉटरी विकणाऱ्या लॉटरी विक्रेत्यांची विक्री ही दिवसें दिवस मंदातली आहे. 'राजश्री ऑनलाईन ' मूळे कंपनी आणि ग्राहक यांच्या हातातच आता सारं काही उरलय. यात विक्रेते, वितरक हे दुर्लक्षित झालेत.बेकारीचे संकट यामुळे लॉटरी विक्रेत्यांपूढे उभे ठाकलय! असे संघटनेचे कार्यध्यक्ष सुमित सातार्डेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
विक्रोळी येथील राजश्री लॉटरी कार्यालयावर दिवसभर चाललेल्या या आंदोलनात प्रभारी सरचिटणीस कमलेश विश्वकर्मा, उपाध्यक्ष संजय नारीग्रेकर,अशोक नलावडे,मुंबई अध्यक्ष विनोद गाडेकर,सचिव संजय शेट्ये आणि पदाधिकारी विद्याधर गायकवाड, सूर्यकांत ( बाबू ) धावले, उदय चेऊलकर, महेश कोळी, गणेश खैरे, ऋत्विका बोरकर, संभाजी डोंगरे, भिकाजी हांडे, जगन्नाथ परब, शांताराम पाटील, विष्णू पाटील, अँड. दिग्विजय राणे हे उपस्थित होते राजश्री चे कामकाज निदर्शक विक्रेत्यांनी पूर्णपणे बंद पाडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ग्लोबल खान्देश महोत्सव 2026 ला जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद; सांगता समारंभ उत्साहात संपन्न!

कल्याण :(प्रतिनिधी - सुनिल इंगळे ) उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ आयोजित ग्लोबल खान्देश महोत्सव 2026 ला जनतेचा अभूतपूर्व प्...