आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १६ एप्रिल, २०२६

भिमप्रेरणा सामाजिक संस्था यांच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पाणी व लाडू वाटप कार्यक्रम संपन्न

घाटकोपर(केतन भोज);भिमप्रेरणा सामाजिक संस्था यांच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त विक्रोळी पार्कसाईट याठिकाणी पाणी व लाडू वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष तथा संस्थापक योगेश शिंदे यांनी केले होते.तसेच या कार्यक्रमाला एसीपी प्राची विनायक कर्णे तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी भेट दिली.यावेळी त्यांनी संस्थेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे कौतुक करत पुढे देखील तुम्ही असे चांगले उपक्रम राबवत राहा असे संस्थेचे पाधिकारी यांना मार्गदर्शन करत,संस्थेच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
        यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष सुगत साळवे,महादेव ढीवरे,प्रमोद कांबळे,रोहित सावंत,महेंद्र दानाने,सुभाष कांबळे,सिद्धेश घोरपडे,सुनिल कांबळे,सुनिल मोहिते,तेजस दळवी,सुमित गमरे आदि संस्थेचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

तेजस्वी फाउंडेशनचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न

ठाणे :तेजस्वी फाउंडेशनतर्फे आयोजित गौरव पुरस्कार सोहळा नुकताच ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयात पार पडला. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय का...