आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, १३ एप्रिल, २०२६

ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघाची नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर ; अध्यक्षपदी सुनिल झळके यांची निवड

कल्याण(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) गेल्या३५वर्षाची ठाणे जिल्हा वृत्तपत्र लेखक संघाची परंपरा आहे.कै.मधुसूदन ठोसर, कै.दि.भा.मुंडले,कै.अरुणकुमार भगत अशा न्यात अन्यात फाऊंडर मेंबर्सनी मेहनत घेऊन हा संघ उभा केला.त्यात आताही संघात असणारे सभादांचे योगदान तेवढेच महत्त्वाचे आहे.बऱ्याच सभासदांनी ऐन उमेदीत संघासाठी कार्यक्रम आयोजित करुन आपली कार्यक्षमता सिद्ध केलेली आहे.आणि आताही नवनियुक्त कार्यकारिणी निवडताना या जुन्या जाणत्या फाऊंडर मेंबर्सनी मार्गदर्शन व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याच अनुषंगाने रविवार दिनांक १२एप्रिल२०२६ रोजी कल्याण येथील प्र.के.अत्रे नाट्यगृहाच्या मागील सुभाष मैदान येथे नवनियुक्त कार्यकारिणीची निवड करण्यासाठी सभा आयोजित करण्यात आली होती.जेष्ठ सदस्य आर.एन.पिंजारी यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली.याप्रसंगी अध्यक्ष-सुनिल झळके, सचिव-सूर्यकांत भडांगे, खजिनदार-अशोक हासे, सह खजिनदार अनंत बोरसे, कार्याध्यक्ष -विजय चव्हाण, उपाध्यक्ष-गुरुनाथ तिरपणकर, सहसचिव-मनोहर गायकवाड, कार्यकारिणी सदस्य-प्रदीप जोशी, नाना म्हात्रे, सल्लागार-अरविंद म्हात्रे,जैतु मुठोळकर, महादेव गोळवसकर,सुनिल इंगळे, विवेक मालशे,आर.एन.पिंजारी.प्रसिध्दी प्रमुख गुरुनाथ तिरपणकर व सुभाष जैन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.अल्पोपहाराची उत्तम सोय संघाचे सदस्य मनोहर गायकवाड यांनी केली होती त्यांचे आभार मानण्यात आले.शेवटी माजी अध्यक्ष अरविंद म्हात्रे यांच्या पत्नी प्रमिला अरविंद म्हात्रे यांच्या निधनामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करुन सभेची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी........ श्रद्धा, सबुरी आणि कृपेचा दिव्य संदेश

भारतभूमी ही संतांची पावन भूमी आहे. या भूमीत अनेक महान संतांनी मानवजातीला अध्यात्म, भक्ती आणि सदाचाराचा मार्ग दाखवला. अशाच तेजस्वी संतांपैकी ...