आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १२ एप्रिल, २०२६

पीईएसच्या आंबेडकर, दोन्ही सिद्धार्थ कॉलेज व रयतच्या केबीपी कॉलेजच्या रक्तदान शिबिराद्वारे महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकरांना केले अभिवादन !!

मुंबई (पी. डी. पाटील ): महात्मा ज्योतिराव फुले (११ एप्रिल ) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल ) यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने त्यांना रक्तदानासारख्या लोकहिताच्या कार्यातून अभिवादन करण्यासाठी सालाबादप्रमाणे, 
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मुंबईतील ३ महाविद्यालये व नवी मुंबईच्या एका महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या पुढाकाराने दादर, चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मीनस व बेलापूर रेल्वे स्थानकावर दि. शुक्रवार दि. १० एप्रिल रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये डॉ. आंबेडकर महाविद्यालय वडाळा, सिद्धार्थ महाविद्यालय आनंद भवन व बुद्ध भवन फोर्ट व कर्मवीर भाऊराव पाटील अशा चार महाविद्यालयाच्या विद्यार्थि व एन एस एस कार्यक्रम अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.‌ दि. ११ एप्रिल रोजीही ठाणे रेल्वे स्थानकावर शिबीराचे आयोजन केले आहे.
       एकूण ४ रक्तदान शिबिरात दादर स्थानकातून ३७, सिएसटी स्थानकातून ४४, चर्चगेट स्थानकातून ४८ व बेलापूर स्थानकातून ६० असे एकूण १८९ बॉटल्स रक्ताचे संकलन झाले. सदर शिबिरातून कामा रुग्णालय, सायन रुग्णालय, जगजीवनराम रेल्वे रुग्णालय व जसलोक रुग्णालयाच्या रक्तपेढीसाठी रक्त संकलन करण्यात आले.
      कोविडनंतर रेल्वे स्थानकावर एन एस एसच्या सहभागाने आयोजित केलेली आत्तापर्यंतची सर्वच रक्तदान शिबिरांना रक्तदात्यांचा उत्तम‌ प्रतिसाद मिळतो. कारण एन एस‌ एस‌चे विद्यार्थी त्यासाठी सातत्याने स्टेशनवर पोस्टर घेऊन फिरून रक्तदात्यांना डोनेशन करण्यासाठी घेऊन येतात. तसेच काही विद्यार्थी माईकवरून जाहीर आवाहन करून लोकांमध्ये रक्तदान करण्यासाठी जनजागृती करतात.
     अशा प्रकारे संयुक्त रक्तदान शिबीर आयोजित करण्याचे हे दुसरे वर्ष आहे, यामध्ये नायर रुग्णालय रक्तपेढीचे माजी CDO श्री अनिल गरेसाहेब समन्वयक म्हणून अत्यंत मोलाचे योगदान नेहमीच करतात. लायन्स क्लब ही सेवाभावी संस्था प्रायोजकाच्या भूमिकेतून सर्वांच्या चहा, नाश्ता जेवणासह ईतरही खर्च करतात. तसेच एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीन खडतार, डॉ. धनंजय चंदनशिवे, प्रा. विशाल करंजवकर‌, प्रा. प्रणिता भाले व डॉ. विष्णु भंडारे त्यांचे प्रत्येकी १०-१२ विद्यार्थी सहभागी झाल्यामुळेच हे शिबीर यशस्वी झाले. सदर शिबिराच्या आयोजनासाठी मुंबई विद्यापिठ स्तरावरून एन एस एस OSD प्रा. सुशिल शिंदे, जिल्हा समन्वयक प्रा. क्रांती उके व प्रा. देशमुख यांचेही सहकार्य मिळाले व त्यांनी सहभागी विद्यार्थी व कार्यक्रम अधिकाऱ्यांचे कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मंत्रालयामधून अखंड वाहतेय भ्रष्टाचाराची गंगा

  महाराष्ट्रामधे विकास कामांच्या नावाखाली फक्त अन फक्त भ्रष्टाचार सुरू आहे. विशेष म्हणजे तो सर्वांना माहितीही आहे. मंत्रालयातील शिपायांपासुन...