आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, ८ मार्च, २०२६

...पतीच्या पाठीशी नाही तर सोबत सुद्धा : व्यावसायिका मंजू झा

आजच्या आधुनिक युगात प्रत्येक स्त्री आपल्या यशाचा झेंडा सर्वत्र मिरवत आहे. स्वतःसोबतच आपल्या कुटुंबाचा विकास सुद्धा हल्लीचा महिलावर्ग करत असतो. नवी मुंबईतील DBS MINTEK कंपनीचे नवी मुंबईतील सर्वेसर्वा बिभाष झा यांच्या पत्नी मंजू झा ह्या एक उत्तम उदाहरण आहेत.
    मंजू झा यांनी बी एस सी, बी.एड तसेच कॉम्पुटर डिप्लोमा मध्ये देखील पदवी संपादन केली आहे. त्यांनी सुरुवातीला महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्य केलं. आणि त्या नंतर आपल्या पतीच्या सोबत खंबीरपणे उभे राहत व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी आपल पाऊल पुढे केलं. गेली अनेक वर्षे मंजू ह्या DBS MINTEK कंपनी सोबत जोडल्या गेल्या आहेत ज्यात घणसोली येथील धुरा त्या स्वतः सांभाळत आहेत. आपल्या या DBS परिवारात अनेकांना रोजगार मिळावा ह्यासाठी त्या सतत कार्यरत असतात. स्वतःसोबत कुटुंबाचा विकास कसा करावा हे आपल्याला व्यवसायिका मंजू झा यांच्याकडून शिकायला मिळत आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

स्त्री शक्तीचा सन्मान आणि संस्था पदवीदान सोहळ्याचे आयोजन

मुंबई (प्रतिनिधी ):भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था, मुंबईच्या वतीने "राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा २०२६" आणि संस्था पदवीदान सो...