मुंबई (सतिश पाटील ): आई एकविरा भक्त मंडळ मुलुंड -मुंबई पालखी पदयात्रा अशी शिस्तबद्ध पालखी गेली 26 वर्ष अध्यक्ष श्री. कैलास पाटील यांच्या नेतृत्वात आणि सर्व मुलुंड गव्हाणपाडा, नवघर, नानेपाडा, नाहूरगाव, जुना मुलुंड तसेच 60 पेक्षा अधिक गावातील लोक मोठ्या श्रध्देने व उत्सवाने सहभाग व सहकार्य करतात. यंदा साधारण 1200 पदयात्री पालखीत सहभागी झाले होते. वय वर्ष 8 ते 80 वर्ष असे पदयात्री पालखीत चालत असतात.
पालखीनिमित्त महाप्रसाद भंडारा मंगळवार दिनांक 7 एप्रिल रोजी शिवगणेश मंदिर नानेपाडा मुलुंड पुर्व येथे होणार आहे तरी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा