मुंबई : नागरी निवारा परिषद, गोरेगाव पूर्व येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यत्मिक विकास व बालविकास केंद्र, (दिंडोरी प्रणित ) यांच्या वतीने नागरी निवारा परिषद, प्लॉट नं. ६, गणेश मंदिर येथे, नवरात्री अष्टमी विशेष ललिता सहस्त्रनाम कुंकूमार्चन सेवा मोठया उत्साहात संपन्न झाली.
असंख्य महिलानी त्यांच्या कुलदेवीचा टाक, फोटो, मूर्ती वर कुंकूमार्चन करून कुलस्वामिनीचा आशीर्वाद घेतला.तसेच रामनवमी निमित्ताने समुहिक रामरक्षा व हनुमान चालीसा पठण विशेष सेवा करण्यात आली. ज्येष्ठ सेवेकरी सुनील पडवळ व श्रीधर कडू यांच्या मार्गदर्शनाखाली वरील सेवा खूप उत्साहात पार पडली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा