आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १ मार्च, २०२६

छत्रपती शिवाजी महाराज प्रायमरींग स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

दिनांक :28 फेब्रुवारी रोजी  शनिवारी सायंकाळी ठीक 5 वा.श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रायमरींग स्कूलउच्च प्राथमिक-माध्यमिक विद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा हजारो पालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन परभणी जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमान रवींदरसिंह परदेशी साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनपर भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे आणि शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचे मनापासून कौतुक करीत म्हणाले की अतिशय लहान विद्यार्थी अगदी स्पष्ट पणे इंग्रजी बोलत आहेत आणि अतिशय उत्कृष्ठ डान्स सादरीकरण करत आहेत या वरून या शाळेचे शिक्षक खुप मेहनती आहेत,आणि हा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारोचा जनसमुदाय पाहून हे लक्षात येते की पालकांचा ही शाळेवर पूर्ण विश्वास असून खरोखच शाळा ग्रामीण भागात आंतरराष्ट्रीय दर्जाच शिक्षण देत आहे हे पाहुन मला खुप समाधान वाटलं.
        कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राणीसारनगरीच्या सरपंच सौ. बबिता ताई ज्ञानेश्वर जाधव होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य सय्यद अल्ताफ अकबर,मोहनकाका गळाकाटू, सुरेश चव्हाण,चेअरमन नागेश जाधव,मधुकर रामजी जाधवसर , बाळासाहेब लटपटे,तानाजी कदम, उपस्थित होते. 
    या प्रसंगी मराठी चित्रपट अभिनेत्री उपासना उल्हास किरपन,साहित्यिक / कलाकार प्रमोद सूर्यवंशी. साहित्यिक हरिश्चंद्र मुकुंद दळवी ,कलाकार स्मिता देशमुख, कलाकार रेखा चंद्रकात हरियाण यांना यांना संस्थेच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला.
        या सांस्कृतिक कार्यक्रमांत विद्यार्थ्यांनी हिंदी व मराठी चित्रपट गीतांवर बहारदार ऑर्केस्ट्रा सादर केला. आकर्षक लावणीने प्रेक्षकांची मने जिंकली. देशभक्तीपर गीते, भारूड तसेच समाजप्रबोधनपर नाटिकांचे सादरीकरणही अत्यंत प्रभावी झाले. विशेष म्हणजे, कार्यक्रमाचे पूर्ण हे सूत्रसंचालन एलकेजी पासून नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी स्पष्ट इंग्रजीबोलत आत्मविश्वासाने केले. यामुळे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
        कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे सचिव श्री. शिवसांब कोरे सर यांनी केले. त्यांनी शाळेच्या शैक्षणिक यशाचा आढावा घेत सांगितले की, शाळेत नियमित नीट,जेईई, आयआयटीचे क्लासेस घेतले जातात. आजपर्यंत शाळेने अनेक डॉक्टर घडवले असून सुमारे ऐंशी विद्यार्थी अभियंते झाले आहेत. चालू वर्षीच्या बॅचमधील चार विद्यार्थी जेईई ला पात्र ठरले आहेत. तसेच एनएमएस परीक्षेत तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून नवोदय शिष्यवृत्ती परीक्षेतही शाळेचा उल्लेखनीय निकाल लागला आहे. शाळेचे पहिली पासूनचे विद्यार्थी स्पष्ट इंग्लिश बोलतात विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी शाळा कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
      या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. शगणाचार्या मॅडम, प्राथमिक विभागाचे प्राचार्य जोसेफ सेवियार सर, क्रीडा शिक्षक परमेश्वर क्षीरसागर सर व सागर सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. वर्षा मेकाले मॅडम, संपदा कटकवार मॅडम,फिजा मॅडम,सुशील राठोड,शिवकुमार सालमोटे, आडे तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे आभार देविदास राठोड यांनी मांडले.
     हजारो पालक व नागरिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या स्नेहसंमेलनाची सांगता उत्साहात व आनंदात झाली. उपस्थितांनी शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक प्रगतीचे भरभरून कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

२७ फेब्रुवारी रोजी जोगेश्वरी भाजपा प्रभाग क्र.७३ मध्ये "मराठी भाषा गौरव दिवस" मोठ्या उत्साहात साजरा करण्या...