आर सिटी मॉल समोरील मेट्रो स्थानकांच्या खांबांना पडलेल्या तड्यांबाबत चर्चा
मुंबई (शांताराम गुडेकर ) शिवसेना नेते सचिव शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष,खासदार श्री.अनिल भाऊ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्राहक कक्षाचे सचिव निखिल सावंत, सचिव अशोक शेंडे यांच्या सुचनेनुसार शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर पश्चिम विधानसभा कक्ष पदाधिकाऱ्यांनी आज (दि.२६/०२/२०२६ ) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) प्रकल्प संचालक व अधीक्षक अभियंता श्री.अमितकुमार रा.गवळी यांची भेट घेऊन निवेदन प्रत दिली.भेटीचे प्रमुख कारण असे की, महानगर पालिका एन विभागात येणाऱ्या आर सिटी मॉल समोरील मेट्रो स्थानकांच्या खांबांना पडलेल्या तड्यांबाबत चर्चा व माहिती देण्यात आली.
या संदर्भात अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली असता त्यांनी सांगितले की, सध्या सुरू असलेल्या मुंबई मेट्रो लाईन ४ च्या कामाचा अंतिम टप्पा सुरू असून जोडणीचे काम करण्यात येत आहे.या प्रक्रियेदरम्यान सिमेंट व पाण्याचे अंतिम मिश्रण (फिनिशिंग मटेरियल) समतल करण्याचे काम सुरू आहे व ते पूर्णत्वास नेण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली.तसेच परिसरातील नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये.सर्व कामे तांत्रिक तपासणीनंतर व सुरक्षिततेच्या निकषांनुसार केली जात असल्याचे श्री. अमितकुमार रा.गवळी यांनी स्पष्ट केले.
यावेळी ग्राहक संरक्षण कक्षाचे विधानसभा संघटक श्री. यशवंत खोपकर, कक्ष प्रसारक श्री. अनंत पवार तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा