आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १५ फेब्रुवारी, २०२६

सिंधुताई सपकाळ समाजभूषण पुरस्कार, २०२६’ ने रेखाताई हिरेमठ यांचा गौरव

मुंबई(शांताराम गुडेकर ) इमेज इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स अंतर्गत प्रदान करण्यात येणारा ‘सिंधुताई सपकाळ समाजभूषण पुरस्कार-२०२६’ हा मानाचा पुरस्कार कर्जत तालुक्यातील शेलू गावातील सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती रेखा बसवेश्वर हिरेमठ यांना प्रदान करण्यात आला.सिंधुताई सपकाळ उर्फ ‘माई’ यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गेली तब्बल २५ वर्षे समाजसेवेचे व्रत जपणाऱ्या रेखाताईंना हा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते दिपक जोशी यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. समाजासाठी असलेली आपुलकी, जिव्हाळा व माणुसकी ही मूल्ये केंद्रस्थानी ठेवून त्यांनी सामाजिक कार्यातून व्यापक जनसंपर्क निर्माण केला. महिलांना सक्षम व स्वावलंबी करण्यासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, विविध शासकीय योजनांचा लाभ महिलांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य, तसेच अनेकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांच्या जीवनात आशेचे व आनंदाचे क्षण निर्माण करण्याचे त्यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी व कौतुकास्पद आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

जंगलेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्साहात संपन्न

मुंबई(शांताराम गुडेकर ) ईशान्य मुंबईत प्रसिद्ध असलेले घाटकोपर पश्चिम येथील जंगलेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्...