आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, १२ फेब्रुवारी, २०२६

त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात : कृष्णा काजरोळकर

    रक्ताची नाती जन्माने मिळतात,मानलेली नाती मनाने जुळतात,पण नाती नसतानाही जी बंधने जुळतात,त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात असे प्रतिपादन ज्येष्ठ वृत्तपत्रलेखक कृष्णा काजरोळकर यांनी विक्रोळी कन्नमवार नगरातील प्रभात मित्र मंडळात केले.मंडळाच्या वतीने त्यांचे घनिष्ठ मित्र लेखक वासुदेव कदम (८२) यांचा वाढदिवस प्रभात समयी हरि ओम कट्ट्यावर साजरा करण्यात आला.त्यावेळी काजरोळकर बोलत होते.कदम यांच्या सोबत परशुराम काळे(९२),भूमय्या सोमा (७१) यांचे देखील वाढदिवस मंडळाच्या वतीने साजरे करण्यात आले.वासूदेव कदम यांना वाचनाची व लेखनाची आवड आहे.त्यांची बोधीवृक्षाची मुळे,वंदितो मी व कथा तथागतांची ही तीन पुस्तके प्रकाशित झाली आहेत असे काजरोळकर यांनी अधोरेखित केले.मंडळाचे माजी अध्यक्ष व विद्यमान कार्यकारिणी सदस्य सुरेश सरनोबत, उपाध्यक्ष निवृत्ती मस्के,चित्रोळीकार मुकुंद कुलकर्णी, रमेश गावकर आदिंनी कदम यांच्या कार्याचा गौरव केला.कार्यकारिणी सदस्य भूमैया सोमा मंडळात लोकप्रिय असून ते मंडळाची कामे उत्साहाने करतात याकडे वक्त्यांनी लक्ष्य वेधून घेतले.सोमा व्यवसायाने टेलर असून उरलेल्या टाकाऊ कपड्यातून ते मंडळाच्या सदस्यांना दरवर्षी आपल्या वाढदिवसाला कापडी पिशव्या देत असतात. ते प्लॅस्टिक पिशव्या वापरू नये असे संदेश देतात.असे काजरोळकर म्हणाले.कार्यक्रमास मंडळाचे सचिव ज्येष्ठ पत्रकार नासिकेत पानसरे,खजिनदार गौतम नि.डांगळे उपस्थित होते.प्रारंभी मंडळाच्या गायकांनी गाणी गाऊन वातावरण प्रफुल्लित केले होते.

      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

ज्ञान स्पर्श" पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

मुबंई :(दत्ता खंदारे )लेखक श्री.प्रभु अग्रहारकर,यांचे तिसरे पुस्तक "ज्ञानस्पर्श"चे प्रकाशन दि.१२ फेब्रुवारी २०२६ रोजी ...