मुंबई (भूषण तांबे): कवी प्रदीप बडदे यांचा "माणुसकीची अंत्ययात्रा" या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी ज्ञानविकास कोपरखैरणे, नवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी चंद्रकांत जोरकर आणि अजित हरवडे यांच्या शुभहस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. प्रदीप बडदे हे उत्तम कवी आणि लेखक असून त्यांना अनेक राज्यस्तरीय पारितोषिके मिळाली आहेत. पत्रकारितेमध्ये देखील त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे. एवढेच नव्हे तर संगीत क्षेत्रात त्यांनी त्यांचे योगदान देऊन उत्कृष्ट गायक असल्याचा ठसा उमटवीला आहे. साहित्यिक क्षेत्रासमवेत भिन्न क्षेत्रात कार्यरत असलेल्या या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने समाजात एकमेव ओळख निर्माण केली आहे.
सदर कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष नागेश हुलवळे आणि प्रमुख अतिथी चंद्रकांत जोरकर आणि अजित हरवडे यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाणे झाली. त्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या मनोगतानंतर प्रदीप बडदे लिखित "माणुसकीची अंत्ययात्रा" कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी कवी प्रदीप बडदे यांचे मनोगत सुद्धा झाले. त्यांनी त्यांच्या मनोगतात या संग्रहाबद्दलचे उद्धीष्टे आणि आठवणी संक्षिप्त स्वरूपात मांडल्या. उपस्थित सर्व मंडळींनी टाळ्यांच्या कडकडाटसह शुभेच्छांचा वर्षाव केला. या कार्यक्रमास अनेक दिग्गजांनी आवर्जून उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढविली.
या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून कल्पनाताई देशमुख होते. तर, ऋतुजा गवस हे या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले. तसेच मराठी साहित्यातील नामवंत साहित्यिक हर्षद पाटील, कल्पना म्हापुस्कर, जयेश मोरे, मनोज उपाध्याय, प्रकाश फर्डे, डॉ.स्नेहा राणे, किशोरी पाटील, उमा रावते, गोविंद पारकर, रश्मी राऊत, सुधाकर कांबळी, आनंद रांजणे, अनिल सोनवणे, महेश जरांडे अशा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुकूल माळी यांनी केले आणि सदर कार्यक्रमाची रंगत वाढवून त्याची उंची एका विशिष्ट स्तरावर नेली. शेवटी ऍड.शंकर बडदे यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्या मान्यवरांचे सहकार्य लाभले त्यांचे आभार मानले आणि कार्यक्रम संपन्न झाला असे जाहिर केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा