मुंबई (प्रतिनिधी) : “शिक्षकाची प्रेरणा, विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करणारा दीप!” अशी विलक्षण भूमिका वठवणारे ज्ञानप्रकाश विद्यालय, घाटकोपरचे सहाय्यक शिक्षक आणि लेखक श्री रविंद्र आनंद सपकाळे यांच्या Chalk and Dream व Echoes of Wisdom या दोन प्रेरणादायी पुस्तकांचा सन्मान महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांच्या शुभहस्ते झाला. शिक्षकी व्यक्तिमत्त्वांची नाविन्यपूर्ण जडणघडण आणि सत्यशोधाचा प्रवास समाजासमोर आला. श्री सपकाळे यांच्या Chalk and Dream या पुस्तकात एक शिक्षक प्रतिकूलतेशी झुंज देत विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नवनव्या योजनांची आखणी व प्रेरणादायी उपक्रम राबवतो, ही संघर्षगाथा अत्यंत हृद्य आणि आशयपूर्ण रीतीने मांडली आहे. तर दुसरे पुस्तक Echoes of Wisdom हे लेखकाच्या अनुभवातून आणि मनस्पर्शी कथांमधून प्रेरणा घेणारे संकलन असून, वाचनानंतर वाचकांना समाजात काहीतरी चांगले करावे, अशी तीव्र ऊर्मी निर्माण करणारे आहे. या गौरवपूर्ण क्षणी लेखकाचे सहप्रवासी म्हणून शिक्षक मित्र श्री सुरेश जाधव सर आणि श्री गणेश जाधव सर उपस्थित होते. सदर भेटीचे आयोजन महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेत्तर सेनेचे राज्यउपाध्यक्ष श्री ज्ञानदेव हांडे सर यांनी करुन शैक्षणिक कार्य वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सातत्याने मिळणारे मार्गदर्शन, तसेच स्फूर्तीस्थान संस्था अध्यक्ष श्री सावंत साहेब, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ टेकाडे मॅडम, पर्यवेक्षिका सौ गोरले मॅडम, सहकारी शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य या यशवेध प्रवासाचा आधार ठरले. “ज्ञानदानाच्या या पवित्र यज्ञात सर्वांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांचे आयुष्य उज्ज्वल करण्याचे प्रयत्न अखंडपणे सुरु राहोत,” असे उद्गार श्री रविंद्र आनंद सपकाळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना काढले. शिक्षण मंत्री महौदयांच्या कौतुकाने प्रोत्सान मिळाले. अथक कार्यात दिसणारे समर्पण, नवचैतन्य, आणि सामाजिक बांधिलकी शैक्षणिक क्षेत्रातील सर्वांसाठी दीपस्तंभ ठरले असे प्रतिपादन त्यांनी केले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रमोद कर्नाड यांना ‘बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५’ जाहीर
नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख ) : बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व कवी प्रमोद कर्नाड यांना “बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अच...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा