गडब(अवंतिका म्हात्रे):कास्प संस्थेच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अॅड. मंगेश नेने यांची सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. तर या निवडणुकीत माजी पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर यांची गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. सामाजिक कार्यातील त्यांच्या दीर्घ अनुभवामुळे आणि संस्थेच्या उपक्रमांमध्ये दिलेल्या सक्रिय योगदानामुळे ही निवड अपेक्षित मानली जात आहे. त्यांच्या निवडीमुळे संस्थेच्या कार्यात नवीन उर्जा आणि दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. कायदा-सुव्यवस्थेतील त्यांचा दीर्घ अनुभव आणि प्रशासन क्षेत्रातील दांडगा पाया लक्षात घेता हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. तसेच यावेळी भाग्यश्री डेंगळे यांची उपाध्यक्षपदी आणि निवेदिता दासगुप्ता यांची सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. नव्या गव्हर्निंग कौन्सिलवर बिनविरोध निवडून आल्याने पेण तालुक्यातील सर्व स्तरातून अॅड. मंगेश नेने यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
वाशी शिर्की खारेपाट नागरीकांचा पिण्याच्या पाण्यासाठी १८ फेब्रुवारीला धोंडबा आंदोलन
पेण (प्रतिनिधी) तालुक्यातील वाशी शिर्की खारेपाट भागातील जनतेच्या पाचविला पुजलेल्या प्रलंबित पिण्याच्या पाणी प्रश्नासाठी १८ फेब्...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा