आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, १ नोव्हेंबर, २०२५

नेताजीं सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा मुंबईत गेट वे ऑफ इंडिया वर उभारा : चंद्रकुमार बोस

     २१ ऑक्टोबर १९४३ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकार स्थापन करून अखंड भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.त्याला 82 वर्षे पूर्ण झाली असून 21 ऑक्टोबर 2025 रोजी देशात व मुख्यत्वे करून महाराष्ट्रात देशभक्तांनी अतिशय उत्साहात व डौलात सर्वत्र झेंडा फडकवला, आपापल्या जिल्ह्यात गावात नागरिकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये , तरुणांमध्ये देशप्रेम व देशभक्ती चे जागरण केले त्याबद्दल राज्यातील जयहिंद सैनिक संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे नेताजींचे नातू जयहिंद सैनिक संस्थेचे राष्ट्रीय संरक्षक देशभक्त चंद्रकुमार बोस यांनी कौतुक केले. 
         24 ऑक्टोबर पासून सन्मा चंद्रकुमार बोस जी सपत्नीक मुंबईत आहेत.जयहिंद सैनिक संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष देशभक्त पंजाबराव मुधाने यांचे मार्गदर्शनाखाली 25 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईत दादर पूर्वचे आरजू सभागृहात सन्मा राज मेहता,सन्मा चंद्रकुमार बोस, मा उपमहापौर बाबूभाई भवानजी यांच्या उपस्थितीत नेताजींना मानवंदना देण्यात आली,त्यावेळी आरजू संस्थेने गरिबांसाठी महात्मा फुले आरोग्य योजनेचे उद्घाटन आरजू संस्थापक राज मेहता यांचे हस्ते झाले .27 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईत मरीन लाईन्स चे इस्लाम जिमखाना येथे सकाळी अकरा वाजता सन्मा चंद्रकुमार बोस,सन्मा इक्बाल मेमन ऑफिसर यांच्या हस्ते तिरंगा झेंडा फडकवण्यात आला तर चंद्रकुमार बोस यांच्या हस्ते ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन चे अध्यक्ष देशभक्त इक्बाल मेमन ऑफिसर यांना "सेवक ए हिंद*"पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यावेळी बोस यांनी जगातील मेमन समाजाने देशभक्ती चे उत्तम उदाहरण पेश करून नेताजींचे आझाद हिंद सेनेला केलेली आर्थिक मदत व शौर्याचे तोंडभरून कौतुक केले.
      28 ऑक्टोबर 2025 रोजी मुंबईत श्री बगडगा टिब्रेवाला कॉलेज,जे बी नगर चकाला अंधेरी येथे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष देशभक्त आकाश घरत यांच्या हस्ते सन्मा चंद्रकुमार बोस, सन्मा पंजाबराव मुधाने, प्राचार्य वालेचा मॅडम यांच्या उपस्थितीत झेंडा फडकवण्यात आला. जयहिंद चा नारा देत चंद्रकुमार बोस यांनी उपस्थित विद्यार्थी, तरुण व उपस्थितांना नेताजींच्या शौर्याच्या कहाण्या सांगितल्या,आणि बोसजींनी देशभक्तीचा मंत्र देत,कदम कदम बढlये जा खुशीके गीत गाये जा हे गाणे विद्यार्थांना सुद्धा गायला लावले.
    "तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दुंगा" आणि जयहिंद चे नाऱ्याने कॉलेज परिसर दुमदुमला.
       श्री बोस पुढे म्हणाले 21 ऑक्टोबर 2018 ला देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर तिरंगा झेंडा फडकावून नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेच्या 26000 शहीद सैनिकांना मानवंदना दिली होती,पण फक्त एकदा करून उपयोग नाही 15 ऑगस्ट प्रमाणे दरवर्षी प्रधानमंत्री यांनी 21 ऑक्टोबरला लालकिल्ल्यावर दरवर्षी तिरंगा झेंडा फडकवला पाहिजे तरच नेताजींना व शहीदांना खरी मानवंदना दिली असे म्हणता येईल कारण 21 ऑक्टोबर ला आझाद हिंद सरकारची स्थापना झाली नसती तर 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य मिळाले नसते.देशाने नेताजींना व शहीदांना सन्मान दिला पाहिजे, तसेच नेताजींचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 झाला त्यांच्या अस्थी जपान मधील रिंकोजी मंदिरात आहेत त्यांना भारतात आणलेच पाहिजे, अशी आग्रही मागणी चंद्रकुमार बोस यांनी श्री मोदीजी यांचेकडे केली, प्रधान मंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी 22 सप्टेंबर 2022 रोजी दिल्लीचे इंडिया गेटवर आताचे कर्तव्य पथावर नेताजींचा भव्य पुतळा उभारला ही स्वागतार्ह व अभिनंदनीय बाब आहे,त्याच प्रमाणे मुंबईतही जयहिंद सैनिक संस्थेचे प्रयत्नांना यश आले असून नेताजींचा पुतळा मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया वर उभारण्यासाठी राज्यपाल, राज्यसरकार व जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली असून तेथेही लवकर नेताजींचा भव्य पुतळा उभारण्यात आला पाहिजे, तसेच दिल्लीत व मुंबईतही 26000 शहिदांचे भव्य स्मारक उभे करून त्यांच्या बलिदानाची उपेक्षा थांबवावी अशी आग्रही मागणी चंद्रकुमार बोस यांनी शासनाकडे केली. श्री बोस यांच्या हस्ते श्रीमती सुनीता भितकर यवतमाळ, जनार्दन जंगले मुंबई, आकाश घरत विरार,इम्तियाज शेख उत्तर महाराष्ट्र, नसीरुद्दीन शाह वाशिम, मुबिन शेख वाशिम, खुशाली महादेव भंडगे वसई , तेजाराम देवाशी विरार यांना राष्ट्रभक्त पुरस्कार देऊन गौरवण्यात आले, मुंबईतील सर्व झेंडावंदनाचे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुंबई जिल्हाध्यक्ष देशभक्त निर्मल सिंग पुनी आणि दीपक बोंबले संपर्क प्रमुख यांनी खूप मेहनत घेतली.
        देशभर व मुख्यत्वेकरून महाराष्ट्रभर नेताजींचे विचार व कार्याचे जागरण करून देशभक्तीमय वातावरण निर्माण करण्यासाठी कठोर मेहनत घेणारे संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष पंजाबराव मुधाने यांचे सन्मा चंद्रकुमार बोस यांनी विशेष अभिनंदन करून आनंद व्यक्त केला, जयहिंद सैनिक संस्थेने असेच कार्य करीत राहावे , नेताजींचे क्रांतिकारी विचार देशभर पसरविण्यासाठी जयहिंद सैनिक संस्थेबरोबर राहून सहकार्य व मार्गदर्शन करण्याचे वचन सन्मा चंद्रकुमार बोस यांनी दिले, मुंबई अध्यक्ष निर्मल सिंग पुनी यांनी सर्वांचे आभार मानले* 
🇮🇳 जयहिंद !! 🇮🇳

 - जनार्दन जंगले
 राष्ट्रीय महासचिव
 जयहिंद सैनिक संस्था

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रमोद कर्नाड यांना ‘बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५’ जाहीर

नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख ) : बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व कवी प्रमोद कर्नाड यांना “बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अच...