मंगळवार, ११ नोव्हेंबर, २०२५
पदमश्री अण्णासाहेब जाधव संस्थेचे कर्मयोगी श्री कल्पेश शिंदे सर यांचा महाराष्ट्र राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मान
मुंबई( प्रतिनिधी): 9 नोव्हेंबर 2025 रोजी वक्रतुंड सभागृह डोबिवली येथे बातम्यांचे दोनच रंग ब्लॅक अँड व्हाईट साप्ताहिक आयोजित राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार सोहळ्यात पदमश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नती मंडळ भिवंडी या संस्थेचे कर्मयोगी, तळेगाव विद्यालयाचे शिक्षक समुपदेशक, ॐ मन:सामर्थ्यदाता समुपदेशन केंद्राचे संचालक, पालघर जिल्हातील वाडा तालुक्यातील बिलघर गावचे श्री कल्पेश मनोहर शिंदे यांना त्यांच्या शैक्षणिक, आध्यात्मिक, समुपदेशकीय, सामाजिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मा.श्री सुधीरभाऊ घागस सर शिक्षणक्रांती संघटना महाराष्ट्र राज्य मा.श्री विनय भोईटे अध्यक्ष विश्वास फाउंडेशन, मा.सौ सारिकाताई भोईटे पवार उद्योग मैत्रीण संपादिका,मा.श्री.विजय यादव सर कार्यकारी संपादक या मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आला.. श्री कल्पेश शिंदे सरांना सन्मानित केल्याबद्दल संस्थेच्या, शाळेच्या, बिलघर गावच्या इतिहासात मानाचा तुरा रोवल्याबद्दल अखंड महाराष्ट्रातुन,तळेगाव पंचक्रोशी, बिलघर पंचक्रोशीतून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रमोद कर्नाड यांना ‘बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५’ जाहीर
नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख ) : बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व कवी प्रमोद कर्नाड यांना “बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अच...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा