आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०२५

ASC collage फुंडे उरण येथील विद्यार्थी कुमार गौरव ठाकूर (चिरनेर उरण) याने 10 मिटर पिस्टल स्पर्धेत पटकावला सुवर्ण पदक ; सर्व स्तरातुन अभिनंदन !!

गडब (अवंतिका म्हात्रे) दिनांक 9/11/2025 ते 11/11/205 दरम्यान झालेल्या मुंबई युनिव्हर्सिटी झोन 1 ही स्पर्धा प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल शहाजी राजे रोड विले पारले येथे संपन्न झाली . या शूटिंग स्पर्धेत 10 मिटर एअर पिस्टल मध्ये वीर वाजेकर ASC collage फुंडे उरण येथिल विद्यार्थी कुमार गौरव ठाकूर चिरनेर उरण याने 10 मिटर पिस्टल मध्ये सुवर्ण पदक पटकवल्या बद्दल त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गौरव सध्या सिद्धांत रायफल क्लब रायगड पनवेल येथिल असणाऱ्या इंडियन मॉडेल स्कूल अँड जुनिअर कॉलेज च्या शूटिंग रेंज वर प्रशिक्षक राष्ट्रीय नेमबाज किशन खारके व अलंकार कोळी यांच्याकडे नेमबाजीचे प्रशिक्षण घेत आहे. त्याच्या या यशाबद्दल वीर वाजेकर ASC कॉलेज फुंडे चे प्राचार्य व स्पोर्ट्स चे प्रशिक्षक यांनी पुढील ऑल इंडिया राष्ट्रीय युनिव्हर्सिटी शूटिंग स्पर्धेकारिता अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

प्रमोद कर्नाड यांना ‘बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५’ जाहीर

नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख ) : बँकिंग क्षेत्रातील ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तिमत्त्व कवी प्रमोद कर्नाड यांना “बँकिंग स्टॉलवर्ट – लाइफटाइम अच...