आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, १ ऑक्टोबर, २०२५

पेण तालुका राष्ट्रवादी च्या सोशल मीडियाच्या उपाध्यक्षपदी सुरेश म्हात्रे यांची नियुक्ती; सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव

गडब( अवंतिका म्हात्रे) पेण येथील गांधी वाचनालयाच्या पटांगणात पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रायगडचे खासदार श्री. सुनील तटकरे यांचा अभिनंदन सोहळा आयोजित केला होता. माननीय नामदार खासदार सुनील तटकरे यांना लोकमत समूहाच्या वतीने पुरस्कार बद्दल पेण तालुका राष्ट्रवादीच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित केला होता सदर सत्कार सोहळ्या प्रसंगी खासदार सुनील तटकरे हे काही कारणास्तव येऊ शकले नाही त्यांच्या उपस्थितीत मा आमदार अनिकेत भाई तटकरे यांनी सत्कार स्वीकारला सदर सत्कार सोहळ्यास प्रसंगी पेण तालुक्यातील इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांना मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
 तसेच पेण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यात पेण तालुका राष्ट्रवादीच्या सोशल मीडियाच्या उपाध्यक्षपदी सुरेश म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली.यावेळी राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर, पेण तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष दयानंद भगत, सेवा दलाचे रायगड जिल्हा अध्यक्ष गंगाधर पाटील, उपाध्यक्ष मोरेश्वर म्हात्रे रायगड जिल्हा चिटणीस परशुराम मोकल रायगड जिल्हा युवक उपाध्यक्ष उदय जवके, पेण शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकूर, तालुका युवक अध्यक्ष विकास पाटील विधानसभा सचिव शांताराम बोरकर
जिल्हापरिषद ज्योतिरपाडा विभाग अध्यक्ष प्रमोद तांडेल ,विधानसभा सचिव नरेंद म्हात्रे, प्रितम केणी ,विकास पाटील ,सुधीर पाटील, अशोक म्हात्रे, महिला विधानसभा अध्यक्षा वसुधा पाटील, विधानसभा सचिव अवंतिका म्हात्रे ,विधानसभा चिटणीस ललिता ठाकुर, तालुका अध्यक्ष चैताली पाटील, रायगड जिल्हा चिटणीस, मीनाक्षी पाटील ,, शहर अध्यक्षा सुचिता चव्हाण, रायगड जिल्हा संघटक सरिता म्हात्रे ,जिल्हा उपाध्यक्ष शालन सावंत, तालुका उपाध्यक्ष जयश्री पाटील ,पेण युवती अध्यक्ष मुस्कान झटाम ,तन्वी हजारे, तृप्ती पाटील, रश्मी भगतआदी पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

श्री म्हसोबा देवस्थान उत्सवाचे आयोजन

मुंबई (पी.डी.पाटील): मेघवाडी, डॉ. एस्. एस्. राव रोड, लालबाग, मुंबई येथील श्री म्हसोबा मंदिर समिती व मेघवाडीतील रहिवाश्यांच्या वतीने गुरुवा...