आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ६ ऑक्टोबर, २०२५

हरिनगर/शिवाजीनगर येथील नागरिकांच्या सोयीसुविधा अबाधित ठेवा ; आमदार अनंत नर यांची संबंधित विकासक व अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना

मुंबई (उदय वाघवणकर) - दि. ६ ऑक्टोबर रोजी आमदार अनंत (बाळा) नर यांच्या माध्यमातून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या के/पूर्व कार्यालयात सहाय्यक आयुक्त यांच्या उपस्थितीत जोगेश्वरी (पूर्व) येथील हरिनगर / शिवाजी नगर एस.आर.ए. योजनेतील सार्वजनिक शौचालयाबाबत मागील अनेक दिवसांपासून उपस्थित झालेल्या समस्येबाबत संबंधित के - पूर्व विभागातील अधिकारी, एस.आर.ए अधिकारी, विकासक आणि स्थानिक नागरिक यांच्या सोबत बैठक आयोजित केली.या बैठकीत परिसरातील सार्वजनिक शौचालय नागरिकांच्या तीव्र विरोधानंतरही विकासकाकडून तोडण्यात येत असल्याबाबत चर्चा करण्यात आली.आमदारांनी संबंधित विकासक व अधिकाऱ्यांना जाब विचारत, नागरिकांच्या सोयीसुविधा अबाधित राहतील याची स्पष्ट सूचना दिली या प्रसंगी उपविभागप्रमूख कैलासनाथ पाठक, जयवंत लाड, शाखाप्रमुख मंदार मोरे, नितीश महात्रे, नंदकुमार ताम्हणकर व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

श्री म्हसोबा देवस्थान उत्सवाचे आयोजन

मुंबई (पी.डी.पाटील): मेघवाडी, डॉ. एस्. एस्. राव रोड, लालबाग, मुंबई येथील श्री म्हसोबा मंदिर समिती व मेघवाडीतील रहिवाश्यांच्या वतीने गुरुवा...