उरण दि ५(विठ्ठल ममताबादे )खालापूर तालुक्यातील हरेश पाटील तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांकरिता स्वतःच्या घरातील धान्य व आपल्या सहकारी मित्रांकडून जीवन आवश्यक वस्तू कपडे चटया झाडू बिस्किट गहू तांदूळ आटा शालेय उपयोगाच्या वस्तू वह्या इत्यादी वस्तू गोळा करून राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे,संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात मुंबई येथे सुपृत केले. प्रसार माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी रायगड वरून आलेल्या मदतीचा उल्लेख विशेषतेने केला, रायगड मध्ये आजही माणुसकी शिल्लक आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले शिकवण शिल्लक आहे महाराष्ट्रामध्ये आलेलं प्रत्येक संकटाला सामोरे जाण्यासाठी रायगडचा मावळा छाती पुढे करतो. रायगड आपत्कालीन परिस्थितीत कधी मागे राहणार नाही असे खालापूर तालुका अध्यक्ष हरेश पाटील यांनी यावेळी सांगितले, रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यातून मदत गोळा करण्यात आली व पक्ष कार्यालयाकडे सुपृत करण्यात आले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
गुणवंत कामगारांना एसटी प्रवास व टोलमाफीच्या सवलती द्या ;राज्य गुणवंत कामगार असोसिएशनची शासनाकडे मागणी; पुरस्कारप्राप्त कामगारांवरील अन्याय दूर करण्याचे आवाहन
मुंबई : सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रातील संघटना व आस्थापनांसाठी तसेच समाजातील वंचित आणि अपेक्षित घटकांच्या ...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा