ठाणे (प्रतिनिधी): अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग ठाणे आयोजित दिनांक 3 ऑक्टोबर 2025 ते 9 ऑक्टोबर 2025 हा अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यासाठी शुक्रवार दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजी अप्पर आयुक्त माननीय श्री गोपीचंद कदम साहेब यांच्या उपस्थित प्रारंभ करण्यात आला.
माझी मराठीची बोलू कौतुके!
परी अमृतातेही पैजा जिंके!!
अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्त मराठी भाषा, मराठी संस्कृती टिकली पाहिजे यासाठी मराठी भाषेचे महत्व आणि आपली जबाबदारी या विषयावर महाराष्ट्र शासन नियुक्त समुपदेशक मा श्री कल्पेश मनोहर शिंदे सर यांनी व्याख्यान दिले आणि कवी श्री रमेश तारमले सर यांनी कविता सादर करून मराठी भाषेचे महत्व वाढवण्यासाठी प्रोत्साहित केले.
अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्ताने श्री कल्पेश शिंदे सर व श्री रमेश तारमले सर यांना अप्पर आयुक्त श्री कदम साहेब यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आले.या विभागात कार्यरत असणारे श्री निलेश पाटील सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी कार्यक्रमाचे अप्रतिम आयोजन नियोजन हृदयाच्या कंपित साठवण्याजोगे होते.. मराठी भाषा आपण जपली पाहिजे, टिकली पाहिजे यासाठी आपण सर्वजण प्रतिज्ञा करूया.. जय मराठी.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा