आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १२ ऑक्टोबर, २०२५

"अंनत आकाश" पुस्तकाचे प्रकाशन मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते ! ठाणे गडकरी रंगायतन येथे प्रकाशन सोहळा संपन्न

मुबंई  (सतिश पाटील): उद्धव ठाकरेंनी दिवंगत अनंत तरे यांच्या आठवणींना आज अंनत तरेचे ऐकले असते पच्छाताप झाला नसता.अठवणींना उजाळा देत एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. तरे यांनी शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर चार वर्षांपूर्वीच चिंता व्यक्त केली होती, जी आता खरी ठरल्याचे ठाकरे म्हणाले. तरे यांच्या 'अनंत आकाश' पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ठाकरेंनी शिंदे यांच्यावर निशाणा साधला.
शिवसेनेचे उपनेते, ठाण्याचे माजी महापौर दिवंगत अनंत तरे यांच्या आठवणींना शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उजाळा दिला. अनंत तरे यांचं ऐकायला हवं होतं. त्यांचं ऐकलं असतं, तर शिवसेना फुटलीच नसती. आता पश्चाताप होतोय, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. अनंत तरे शिवसेनेकडून महापौर, आमदार राहिले. त्यांच्या आयुष्यावरील 'अनंत आकाश' पुस्तकाचं प्रकाशन आज उद्धव ठाकरेंच्या हस्ते संपन्न झालं. योगेश कोळी यांनी तरे यांच्या आयुष्यावरील पुस्तक लिहिलं आहे.
    ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. शिवसेना माजी.खासदार राजन विचारे ,खासदार:संजय पाटील , खासदार सुरेश म्हात्रे, खासदार अरविंद सावंत,खासदार  सुरेश म्हात्रे,मा.नगरसेवक संजय तरे, मा.अतुल पाटील असे दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
       तेव्हा ठाकरेंनी भाषण केलं. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या इतिहासातील सगळ्यात मोठं करणाऱ्या एकनाथ शिंदे यांचा अप्रत्यक्षपणे समाचार घेतला. 'आता त्यांना पदं मिळाली आहेत. पण ज्यावेळी त्यांचा वापर संपेल, तेव्हा त्यांना कचराकुंडीत फेकून देण्यात येईल. तेव्हा मग कपाळ्यावर हात बडवत तुम्हाला ते याच ठाण्यात दिसतील. अनंत तरेंचं तेव्हाच ऐकायला हवं होतं. आता मला पश्चाताप होतोय. तेव्हा तरेंचं ऐकलं असतं तर शाहांसमोर हंबरडा फोडणारे बघायला मिळाले नसते,' असा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदे यांना लगावला.
शिंदे यांच्याबद्दल काय म्हणालेले अनंत तरे?
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या इतिहासातील सर्वात मोठं बंड करत संपूर्ण पक्षच ताब्यात घेतला. त्यांनी शिवसेनेचं चिन्हही मिळवलं. या बंडानंतर अनंत तरे यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात त्यांनी शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर कडाडून टीका केली होती. शिंदेंना आवरा असं मी उद्धवजींना सांगितलं आहे. नाही तर हा दुसरा नारायण राणे होईल, अशी भीती तरे यांनी व्यक्त केली होती. तरे यांचं ४ वर्षांपूर्वी निधन झालं. पण शिंदेंबद्दलचा त्यांचा व्हिडीओ बंडानंतर व्हायरल झाला.
तरेंचे शब्द तंतोतंत खरे ठरले
'मी जेव्हा रायगड लोकसभा लढवली तेव्हा शिंदे नगरसेवक पण नव्हते. आता सगळे निर्णय ते एकटेच घेतात. या संघटनेतील निर्णय घेण्याचा अधिकार फक्त मातोश्रीला आहे. आधी तो माननीय बाळासाहेबांना होता, आता तो अधिकार उद्धवजींना आहे. आम्ही जर निर्णय घ्यायला लागलो, तर या संघटनेचे तुकडे तुकडे होणार. माझी नाराजी उद्धवजींवर नाही. एकनाथ शिंदे ज्या पद्धतीनं काम करत आहेत, त्यांना पाहून मी उद्धवजींना सांगितलंय की याला आवरा. या शिंदेला आवरा. नाही तर हा दुसरा नारायण राणे होईल. हा फक्त आपले आपले निवडतो. बाकी सगळ्यांना कामाला लावतोय,' असं तरे म्हणाले होते. शिंदे यांच्या बंडानंतर तरे यांचं भाकित पूर्णपणे खरं ठरल्याची चर्चा झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

युवाशक्ती स्वयंसेवी संस्था नवी मुंबई व विद्यार्थी प्रतिष्ठान भांडुप वतीने शांतीवन पनवेल येथे केली दिवाळी साजरी

पनवेल( प्रतिनिधी):   युवाशक्ती स्वयंसेवी संस्था, नवी मुंबई च्या वतीने दरवर्षी सामाजिक भान जपणारा दिवाळी उपक्रम राबवला जातो. दिवा...