मुंबई( गणेश हिरवे) १५ ऑगस्ट रोजी आपल्या भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिवस जोगेश्वरी पूर्व येथील श्यामनगर सार्व गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक व पत्रकार गणेश हिरवे उपस्थित होते.त्यांनी आपल्या भाषणात आपण जग बदलण्यापेक्षा स्वतःला बदलले तर अनेक चांगल्या गोष्टी जुळून येतील.छोटी छोटी कामे आपण आनंदाने केली तर त्यात खूप समाधान आपल्याला मिळते असा अनुभव सांगितला.शामनगर मंडळाचे कार्य छान असून जोगेश्वरी आणि मुंबईत एक नावाजलेले मंडळ म्हणून त्याचा होणारा उल्लेख ही अभिमानाची बाब आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष दशरथ मोरे, सचिव सुदेश धुरी, कोषाध्यक्ष मितेश साळवी, गणेशोत्सव समन्वय समितीचे सहकार्यवाह शिवाजी खैरनार, ज्येष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला कार्यकर्त्यां मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.महिलांनी ध्वजस्तंभ खूप छान सजविला होता.हीरक मोहत्सवा निमित्त यंदा मंडळातर्फे पर्यावरण पुरक कापडी पिशव्या वितरीत करण्यात येणार आहेत अशी माहिती अध्यक्ष मोरे यांनी दिली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
विसर्जनावेळी “श्री स्वामी समर्थ कट्टा ” परिवाराकडून गणेश भक्तांना पुरी भाजी
मुंबई : आर्थर रोड येथील श्री स्वामी समर्थ मठात कै राजेंद्र विश्राम चव्हाण यांच्या स्मरणार्थ, गणेश भक्तांना पुरी-भाजीचे वाटप करण्...
-
मुंबई (शांताराम गुडेकर ) भारतीय संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज साकीनाका येथील समता विद्या मंदिर शाळेत विद्यार्थ्यांनी स...
-
मुंबई : गोरेगाव पुर्व येथील संकल्प सहनिवास सांस्कृतिक मंडळ व संकल्प सहनिवास फेडरेल यांच्यावतीने दीपावली महोत्सव २०२४ च्या निम...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा