आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १७ ऑगस्ट, २०२५

स्वातंत्र्य दिनानिमित्त किराणा वाटप

मुंबई(गणेश हिरवे )जोगेश्वरी पूर्व येथील सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत सालम, सुहासिनी वरटी, फिलिप रॉड्रिग्ज, सीमा जोसेफ आणि गणेश हिरवे यांच्या पुढाकाराने नुकतेच २५ दृष्टीहीन लोकांना किराणा सामान देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त वितरीत करण्यात आले.दरवर्षी विविध स्पेशल दिवस आणि सण उत्सवा दरम्यान हिरवे सर गौर गरीब वंचित आदिवासी लोकांना आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने काही ना काही देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतात.आजपर्यंत हजारो गरजूंना त्यांच्या माध्यमातुन विविध शैक्षणिक साहित्य, किराणा मिळालेला असून यापुढेही आमचे वैयक्तिक आणि सांघिक स्वरूपात समाजाला मदत करण्याचे कार्य सुरूच राहणार असल्याचे गणेश हिरवे यांनी सांगितले.किराणा मिळालेल्या लोकांनी मदत करणाऱ्या सर्व लोकांसाठी यावेळी प्रार्थना केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

काव्यांगण... शिक्षक दिन विशेष

आवडते मला माझी शाळा सकाळी भरतो गोपाळाचां मेळा शाळेत माझ्या भरपूर खेळ मुलाचां बसला त्याच्याशी मेळ आनंदाने येतात सगळी मंडळी डब्यात खाऊ भाजी पो...