मुलुंड शाखा १०८ च्या वतीने शाखाप्रमुख श्री शैलेश धर्मराज पवार आयोजित सर्व शिवसैनिक पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित राहून ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात साजरा केला .१०८ चे शाखा प्रमुख शैलेश पवार यांच्या कडून अनेक उपक्रम राबविण्यात येतात.मंगळागौर अनेक महिला उत्साहात सहभागी होवून यथेच्च भाग घेऊन झिम्मा फुगडी , फेर धरून गाणी व उखाणे बोलून कार्यक्रमाचा लाभ घेतात.सर्व महीला मराठमोळा नववारी पेहरावात उपस्थित राहतात. हा कार्यक्रम राबविण्यासाठी महीला वर्गाचा मोलाचा वाटा असतो.
या वर्षी कार्यक्रम लायन्स क्लब मुलुंड (प.) येथील हाॅल मध्ये संपन्न झाला.मुलुंड पश्चिमेतील इंदिरा नगर नं.३ येथे ह्या वर्षी प्रथमच दही हंडी फोडायला निघणाऱ्या श्री साईगोविंदा पथकाला शाखाप्रमुख श्री शैलेश पवार यांनी श्रीफळ वाढवून हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच यावेळी तेथील बालगोपाल गोविंदाचा उत्साह व जिद्द पाहून शाखाप्रमुख श्री शैलेश पवार यांनी मुलुंड मधील विविध गोविंदा मंडळांच्या दहीहंडी फोडण्यासाठी निघालेल्या श्री साई गोविंदा पथकाला टेम्पो, अल्पोहार व पाण्याची सोय करून दिली आहे. यावेळी उपशाखाप्रमुख श्री स्वप्निल सूर्यवंशी, श्री प्रविण पराडकर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा