मुंबईतील शेकडो गोविंदा पथकांनी या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदवला. काही पथकांनी पारितोषिक न घेता आयोजकांच्या कार्याला सलामी दिली व सहकार्य केले. पाच थरांसाठी ५०१ रुपये, तर सहा थरांसाठी ११११ रुपये सन्मानचिन्ह तसेच केंब्रिज शर्ट देण्यात आला. याशिवाय दोन गोविंदा पथकांनी सात थरांची सलामी दिल्याबद्दल त्यांना ५,००० रुपये रोख व इतर सप्रेम भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.
या सर्वांमध्ये अमर सुभाष गोविंदा पथकाने तब्बल आठ थर लावून मानाची दहीहंडी फोडण्याचा मान पटकावला. उद्घाटनासाठी सहयोग मित्र मंडळ, कुंभारवाडा-दादर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आयोजकांनी संकल्प केल्याप्रमाणे या उत्सवातून मिळालेल्या निधीतून टाटा रुग्णालयातील काही कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत करण्यात आली तसेच केम रुग्णालयातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान देण्यात आले.
कार्यक्रमाला युवा सेनेचे सचिव साईनाथ दुर्गे, उपविभाग प्रमुख सिद्धार्थ चव्हाण, कैलास पाटील, सिने अभिनेते अभिजित कदम, पत्रकार विवेक पाटकर, केतन खेडेकर यांच्यासह शिवसेनेचे अनेक आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. सुयोग्य नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी धगधगती मुंबईचे संपादक भीमराव धुळप व माहीम विधानसभा निरीक्षक यशवंत विचले यांचे विशेष कौतुक करण्यात आले.हा दहीहंडी उत्सव केवळ खेळ-उत्सव ठरला नाही तर ‘माणुसकीचा सोहळा’ ठरून समाजापुढे एक चांगला आदर्श निर्माण केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा