आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २८ ऑगस्ट, २०२५

वनिता फाउंडेशन व सम्यक वैद्यकीय शिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या वतीने राष्ट्रीय जीवन भरारी संमेलनात अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा विलोभनीय सत्कार सोहळा संपन्न

मुंबई (प्रतिनिधी) वनिता फाउंडेशन व सम्यक वैद्यकीय शिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई तसेच नॅशनल टॅलेंट बुक ऑफ हुमन रेकॉर्ड यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या रेगे सभागृहात राष्ट्रीय जीवन भरारी संमेलनाच्या निमित्ताने "सन्मान कार्यकर्तृत्वाचा" सन्मान अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा" विलोभनीय सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समृद्धी प्रकाशनचे संचालक प्रा. डॉ. बी. एन. खरात व वनिता फाउंडेशनच्या अध्यक्षा वनिता प्रभाकर कांबळे होत्या.
       प्रारंभी या राष्ट्रीय जीवन भरारी संमेलनाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मेणबत्ती प्रज्वलित करून करण्यात आले असून कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते शेखर फडके ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भूपेंद्र संख्ये, अभिनेते व दिग्दर्शक सुयश शिर्के राष्ट्रपती शौर्य पदक विजेते सेवानिवृत्त अग्निशामक अधिकारी तुकाराम मारुती पाटील उपस्थित होते. तसेच वनिता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ,गुणवंत कामगार व विशेष कार्यकारी अधिकारी प्रभाकर तुकाराम कांबळे व सम्यक वैद्यकीय व शिक्षण चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र सहदेव जाधव यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले असून सर्व मान्यवरांचे सन्मानचिन्ह व सन्मानपत्र शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
        राष्ट्रीय जीवन भरारी संमेलनात सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून समाज हितासाठी सतत लढत असणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वांना राष्ट्रीय गुणवंत जीवनगौरव पुरस्कार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार, मुंबई उद्योजक पुरस्कार, रवींद्रनाथ टागोर ग्लोबल अवॉर्ड, राष्ट्रीय जीवन भरारी पुरस्कार, क्रांतीज्योती समाज रत्न पुरस्कार, राष्ट्रीय शौर्य जीवनरत्न पुरस्कार, महाराष्ट्र समाज गौरव पुरस्कार व महाराष्ट्र सम्यक क्रांती पुरस्कार अशा विविध पुरस्काराने प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले असून सन्मान कार्यकर्तृत्वाचा व सन्मान राष्ट्राचा असा हा राष्ट्र सन्मान सोहळा संपन्न झाला असून समृद्धी प्रकाशन चे संचालक प्रा.डॉ. बी एन खरात वनिता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर कांबळे व सम्यक वैद्यकीय शिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई अध्यक्ष राजेंद्र जाधव वनिता फाउंडेशनच्या अध्यक्षा वनिता कांबळे सम्यक वैद्यकीय शिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई पदाधिकारी अंकुश राजपुरे नंदिनी जाधव त्याचबरोबर श्वेता शिर्के गणेश अमृतकर विशाल देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले त्याचबरोबर सर्व प्रमुख मान्यवरांनी मोलाचे मार्गदर्शन केले असून सर्व पुरस्कार पुरस्कार प्राप्त व्यक्तींना शाल पुष्पगुच्छ सन्मानपत्र व सन्मानचिन्ह अभिनेते शेखर फडके राष्ट्रपती शौर्य पदक विजेते तुकाराम पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला महाराष्ट्रातून विविध क्षेत्रात कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांना अल्पोपहार देण्यात आला असून शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आले व सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार राजेंद्र जाधव यांनी मांडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

काव्यांगण... शिक्षक दिन विशेष

आवडते मला माझी शाळा सकाळी भरतो गोपाळाचां मेळा शाळेत माझ्या भरपूर खेळ मुलाचां बसला त्याच्याशी मेळ आनंदाने येतात सगळी मंडळी डब्यात खाऊ भाजी पो...