मुंबई (प्रतिनिधी )ऑल इंडिया फिल्म प्रोडूसर टेक्निशियन अँड आर्टिस्ट इंडियन यांच्या वतीने भारतीय संविधान सप्ताह निमित्त गुणवंत कामगार व विशेष कार्यकारी अधिकारी वनिता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राज्य गुणवंत कामगार असोसिएशन चे मुंबई जिल्हाध्यक्ष प्रभाकर कांबळे गुणवंत कामगार केरबा हरीबा डावरे अष्टपैलू कलाकार व गुणवंत कामगार विद्याधर राणे संजय तावडे सम्यक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्र गौरव पुरस्कार दैनिक प्रहार चे संपादक सुकृत खांडेकर गाडगे महाराज ट्रस्ट चे अध्यक्ष हेमंत सामंत सामाजिक कार्यकर्ते डॉ.राजू राम आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह सन्मानपत्र शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धडक कामगार युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष दैनिक मुंबई मित्रचे संपादक अभिजीत राणे होते.
ऑल इंडिया फिल्म प्रोडूसर या टेक्निशियन अँड आर्टिस्ट इंडियन यांच्यावतीने भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळा संविधानाचे मूल्याच्या गौरव करणारा आणि त्यांच्यासाठी प्रयत्न करणाऱ्याचा सन्मान करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून भारतीय संविधान हे भारताच्या लोकशाहीचा आधार असल्याने संविधानाचे संरक्षण करणे आणि त्याचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे .सन्मान संविधानाचा कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा सन्मान संस्थेचे अध्यक्ष दीपक कलिंगन यांच्यावतीने नुकताच मुंबई मराठी पत्रकार संघात कार्यक्रम संपन्न झाला. असून कार्यक्रमाला जनरल एम्पलॉइज असोसिएशनचे अध्यक्ष नंदकिशोर खानविलकर साहित्यिक विलास खानोलकर सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभाताई पवार डॉ.
शरद देशमुख आदी मान्यवराच्या उपस्थितीत गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे, विद्याधर राणे, तानाजी निकम, केरबा डावरे, संजय तावडे, ज्येष्ठ समाजसेवक राजेंद्र जाधव यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले असून कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार कौशल्या रोजगार उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केले असून व शुभेच्छाही दिल्या असल्याचे गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा