मुंबई प्रतिनिधी: माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणाऱ्या महामानवाला ६८वा महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी,भारताच्या कानाकोपऱ्यांतून येत असताना, दादर रेल्वे स्थानक जवळ शिवाजी पार्कच्या दिशेने नक्षत्र माॅल शेजारी सामाजिक संस्था आधारस्तंभ सामाजिक संस्था (रजि),समस्त रानडे रोड फेरीवाले,दुकानदार व रहिवासीच्या वतीने,मंडप मध्ये, उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून, दीप प्रज्वलन करून बुद्ध वंदना करुन, शिवाजी पार्कच्या दिशेने जाणाऱ्या अभिवादन करण्यासाठी,प्रत्येक अनुयायांना बिस्कीट-वडापाव आणि पाणी बाटल्या वाटप करण्यात आले.
तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापरिनिर्वाण दिनानिमित्त "कोकणदीप विशेष अंकाचे प्रकाशन"करण्यात आले. आधारस्तंभ सामाजिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष श्री व सौ.सतिश थोरात,धम्म संस्कार संस्था-ठाणे, तसेच जेष्ठ पत्रकार शशिकांत सावंत, कोकणदीपचे संपादक दिलीप शेडगे आणि साहित्यिक व कवी विलास देवळेकर यांच्या हस्ते करण्यात आले.आणि "चैत्यभूमी" कडे जाणाऱ्यांना 'कोकण दीप विशेष अंकाचे' वाटप करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा