आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ८ सप्टेंबर, २०२५

विक्रोळीत पार पडले आदरांजली पर कवी संमेलन ; कवी प्रतिक कांबळे यांच्या बापावर थोडं लिहावं म्हणतो या कवितेने अश्रू अनावर

विक्रोळी( प्रतिनिधी): शाहीर कुंदन कांबळे यांचे चिरंजीव चंदन कांबळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विक्रोळीत रत्नबोधी बुद्ध विहार येथे ८ सप्टेंबर रोजी आदरांजली पर कवी संमेलन पार पडले .सदर कवी संमेलनात जेष्ठ, श्रेष्ठ तसेच नव कवी शाहीर आदींनी उपस्थिती दाखवत आपल्या काव्यातून आदरांजली अर्पण केली.सदर कवी संमेलन हे सकाळी ११ ते २ या कालावधीत पार पडले.
     यात कवी संमेलन मध्ये ज्येष्ठ कवी किरण सोनावणे, के. पुरुषोत्तम, शाहीर जोंधळे, वसंत हिरे, प्रतीक कांबळे, संतोष नरवाडे, हिरामण जोशी, उमेश जाधव, संदेश उमप, सुभाष आढाव, अंजली जाधव, नंदिनी संखे आदी कवी उपस्थित होते. यावेळी कौटुंबिक वारसा जपत कवी प्रतिक कांबळे यांच्या बापावर थोडं लिहावं म्हणतो ह्या कवितुन त्यांनी आठवणींना उजाळा देत उपस्थिताचे अश्रू अनावर झाले.तसेच उमेश जाधव यांना देखील काव्य सादर करताना भावूक झाले आदी कविंनी देखील चंदन यांच्या कार्याला उजाळा दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

विक्रोळीत पार पडले आदरांजली पर कवी संमेलन ; कवी प्रतिक कांबळे यांच्या बापावर थोडं लिहावं म्हणतो या कवितेने अश्रू अनावर

विक्रोळी( प्रतिनिधी): शाहीर कुंदन कांबळे यांचे चिरंजीव चंदन कांबळे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विक्रोळीत रत्नबोधी बुद्ध विहार येथे ८ सप्...