आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २० डिसेंबर, २०२४

श्री सरस्वती साईश्वरी संस्था आयोजित निशुल्क शिबीर

कांजुरमार्ग : श्री सरस्वती साईश्वरी संस्थेमार्फत  निशुल्क शिबीराचे आयोजन रविवार दिनांक २२ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० वा. स्थळ डॉ. गढरी जवळ, शास्त्रीनगर, कांजुरमार्ग (पूर्व), मुंबई याठिकाणी करण्यात आले आहे.
      या शिबिरात विविध शासकीय पेन्शन योजना, त्याबाबत मार्गदर्शन व पात्र असणाऱ्याचे फॉर्म भरण्यात येणार आहेत. प्रामुख्याने विधवा पेन्शन योजना (१८ वर्षे खालील मुल) , अविवाहित पेन्शन योजना (फक्त महिलांसाठी वय वर्ष ३६ वर्षापुढे) , बालसंगोपन / अनाथ पेन्शन योजना , अपंग पेन्शन योजना ४०% + , श्रावण बाळ पेन्शन योजना ,दुर्धर आजार पेन्शन (कॅन्सर, टी.बी., पॅरेलाईस १००%) अशा शासकीय योजनांबाबत   श्री. विशाल चव्हाण सर, श्री. अरुण कदम साहेब तसेच सौ. वैशाली धनावडे मॅडम यांच्याकडून प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे.
       या शिबिरासाठी  रेशनकार्ड , लाईट बील, जन्म किंवा शाळा सोडल्याचा दाखला , आधार कार्ड , बँक पासबुक , घराशेजारील ३ जणांचे रेशनिंग कार्ड झेरॉक्स ,पॅन कार्ड ,मृत्युचा दाखला , मतदान कार्ड , ३ फोटो , अपंग दाखला योजनेत पात्र ठरलेले २ झेरॉक्स सेट  अशी आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत. शिबिराचे सहप्रायोजक सौ. श्वेता राजेश पावसकर आहेत.अधिक माहितीसाठी  सुरज बांदकर - 996 996 0 272 व नुतन रावराणे यांच्याशी संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

महिला वादक, गायिकांच्या सादरीकरणाने संगीतप्रेमी तृप्त

नवी मुंबई : लता मंगेशकर, आशा भोसले या नामांकित गायिकांनी अजरामर केलेली एकाहुन एक सुंदर, श्रवणीय गाणी "रहे ना रहे हम" ...