आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ३ डिसेंबर, २०२४

कै. श्री परशुराम काशिनाथ गायकर यांना देवाज्ञा !

अलिबाग प्रतिनिधी दिनेश तुरे यांजकडून : - कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की, मुक्काम - वावे, तालुका - अलिबाग, जिल्हा - रायगड येथील आगरी समाजाचे, मनमिळावू स्वभावाचे, प्रेमळ - मायाळू व अध्यात्मिक व्यक्तीमत्व, निरंकारी संत समागमाच्या माध्यमातुन आपल्या अध्यात्मिक विचारांच्या माध्यमातुन लोकप्रबोधन करणारे व्यक्तीमत्व म्हणून अलिबाग तालुक्यात सर्वानाच परिचित होते. प्रकृती असवस्थ्यामुळे त्यांना कामोठे येथील एम. जी. एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, आठ दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते, उपचारांना चांगला प्रतिसाद देत होते व सर्वांशी हॉस्पिटल मध्ये देखील बोलत होते, अशा स्थितीत त्यांचा मृत्युशी चालू असणारा संघर्ष व झुंज व्यर्थ ठरली व अखेरीस गुरुवार दिनांक २८/११/२०२४ रोजी वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी या इहलोकाचा निरोप घेतला, त्यांच्या पश्चात पत्नी - सुलभा, मुले : राकेश व केतन, भाऊ: शिवराम व मंगेश , पुतण्या : योगेश व गायकर कुटुंबीय असा विशाल परिवार आहे. एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. त्यांच्या दुःखद निधनाने गायकर कुटुंबीय व वावे ग्रामस्थ शोकसागरात बुडाले आहेत, त्यांच्या अकस्मात निधनाने विभागात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे, मृद्भभाषी व्यक्तीमत्व कै. परशुराम काशिनाथ गायकर हे समाजसेवेत सतत रममाण असायचे, जे का रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधु ओळखावा , तोची देव पहावा. लोकांच्या सुख - दुःखात ते सतत धावून जायचे, त्यांच्या अंगी विद्वत्ता ठासून भरली होती त्यामूळेच त्यांचे मोलाचे मार्गदर्शन सर्वांना लाभायचे , त्यांच्या परोपकारी वृत्तीने व प्रेमळ स्वभावाने त्यांनी जनमानसात मानचे स्थान निर्माण केले होते, त्यांच्या निधनाने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यामूळेच त्यांच्या अंत्यविधी समयी सामाजिक - राजकीय व अध्यात्मिक शेत्रातील जनसमुदाय मोठ्या संख्येने वावे स्मशानभूमीत त्यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होता व हीच त्यांच्या सामाजिक व अध्यात्मिक कार्याची पोहचपावती होय. वावे गावातील श्रीराम जन्मोत्सव व गावदेवी ऊत्सवात व इतर सामाजिक कार्यात त्यांचा मोलाचा सहभाग असायचा, तसेच वावे ग्रामस्थ नाट्य मंडळाचे ते दिग्दर्शक होते, तसेच गावातील अनेक सामाजिक व ऐतिहासिक नाटकात त्यांनी अजरामर भूमिका साकार केल्या होत्या, त्यांची
 प्रॉमटिंग अप्रतिम असायची. तसेच विभागात कुशल गवंडी अशी त्यांची ख्याती होती , असा नावलौकिक व विश्वास त्यांनी प्राप्त केला होता. आयुष्यभर काबाड कष्ट करून त्यांनी मोठा संघर्ष करून कुटुंबाचा डोलारा समर्थपणे सांभाळला होता. अजातशत्रू असे प्रेमळ व्यक्तीमत्व हरपल्यामुळे वावे गावात व विभागात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
            त्यांचे दिवसकार्य रविवार दिनांक ०८/१२/२०२४ रोजी त्यांच्या मुक्काम : वावे, अलिबाग - रायगड या निवासस्थानी सकाळी ९ .०० वाजता होणार आहे , असे गायकर कुटुंबियांकडून कळविण्यात आले आहे.
         दादा , ऐसा देह लाभावा, देहाची चंदन व्हावा, शरीर लोप पावले तरी तुमच्या प्रेमळ व मायेच्या आठवणींचा व तुमच्या कार्याचा व कर्तृत्वाचा हा सुगंध सतत दरवळत रहावा हेच मागणे त्या विश्वविधात्याकडे, दादा जीवनाच्या प्रत्येक वळणावर तुमची उणीव जाणवणार ! दादा, तुमच्या प्रेमळ मायेच्या आठवणीने कंठ दाटून येत आहे , या मायेच्या आठवणी ह्या सर्वांना व्यथित करतात, त्या आठवणी ह्या सदैव स्मरणात राहतील! दादा आपल्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रध्दांजली! भावपूर्ण श्रद्धांजली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

युवांसाठी प्रेरणादाई असलेल्या श्रीमती आयएएस त्रुप्ती धोडमिसे 'युथ आयकॉन अवॉर्ड २०२५' ने सन्मानित

मुंबई (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर) सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित कार्यक्रमात कोकण एनजीओ इंडिया तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आय...