मंगळवार, ३ डिसेंबर, २०२४
आमदार अनंत नर यांची हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालयाला धडक ; मनपा प्रशासनाला धरले धारेवर !!
मुंबई (उदय वाघवणकर) - ०३ डिसेंबर रोजी जोगेश्वरी विधानसभा आमदारअनंत नर यांनी जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मनपा ट्रॉमा केअर रुग्णालय येथे रुग्णसेवेत असलेल्या कंत्राटी कामगार व रुग्णसेवेतील मोठ्या कमतरता व प्रशासनाची दिरंगाई या संदर्भात रुग्णालयातील वरिष्ठांशी चर्चा केली.यामध्ये कंत्राटी कामगारांचे पगार वेळेवर न होणे, पेमेंट स्लीप न मिळणे, भविष्यनिधी, अपघात विमा अशाप्रकारच्या अनेक समस्यांचा पाढा यावेळीवाचून दाखवला.तसेच अति - दक्षता विभाग (आयसीयू), शस्त्रक्रिया विभाग अशा रुग्णसेवेकरिता असलेल्या सुविधा देखील दुर्लक्षित पडल्या आहेत.अश्या प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित करून त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले.कामगारांच्या विषयासंदर्भात कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा नोंदवण्याकरिता जोगेश्वरी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले.यावेळी रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
युवांसाठी प्रेरणादाई असलेल्या श्रीमती आयएएस त्रुप्ती धोडमिसे 'युथ आयकॉन अवॉर्ड २०२५' ने सन्मानित
मुंबई (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर) सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित कार्यक्रमात कोकण एनजीओ इंडिया तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आय...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
-
ठाणे : रविवार दि.०८ डिसेंबर २०२४ रोजी खिडकाळीमध्ये 'TALENT CLASS' चे प्रो.राजन पाटील आणि सौ.प्रा.किर्ती पाटील यांच्या सं...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा