मुंबई (प्रतिनिधी )मुंबई उपनगर भांडुप पश्चिम येथील कमल पार्क सोसायटीच्या व्यवस्थापन समितीची पंचवार्षिक निवडणूक सन 2023 -24 ते 2028 -29 या कालावधी करिता निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाकर तुकाराम कांबळे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र डी कांबळे यांच्या अधिपत्याखाली संस्थेच्या कार्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून सर्वसाधारण गटातून संदीप बिरजे, दीनानाथ धुरी ,भूषण मुळीक , मुत्यूकृष्णन पिल्लई, प्रशांत परब, प्रशांत कुमार
शेरवेगार ,सुहास सातार्डेकर , तुषार विश्वासराव, हे आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले होते ,संस्थेच्या 28 सभासदांपैकी 23 सभासदानी आपला मतदानाचा हक्क बजावून आठ पैकी पाच उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणले असून प्रशांत कुमार शेरवेगार यांना जास्तीत जास्त मते पडलीअसून संदीप बिरजे, सुहास सातार्डेकर,,तुषार विश्वासराव व प्रशांत परब हे सुद्धा प्रचंड मतांनी निवडून आले असून महिला राखीव मतदारसंघातून सविता प्रमोद सावंत यांचा एकच अर्ज आल्याने त्या बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाकर तुकाराम कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
कमल पार्क डी विंग को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची सभा निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाकर कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या कार्यालयात नुकतीच पार पडली असून त्यामध्ये तुषार मुकुंद विश्वासराव यांची अध्यक्षपदी तर सुहास सुरेश सातार्डेकर यांची सचिव पदी व संदीप शिवराम बिरजे यांची खजिनदार पदी सर्वानुमते निवड करण्यात आली असून संचालक पदावर प्रशांत कुमार शेरवेगार, प्रशांत परब व संचालिका पदी सविता प्रमोद सावंत यांची निवड करण्यात आली असून या सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाचे संस्थेच्या सभासद वर्गातून व विभागातील सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत असून संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाने संस्थेचा पारदर्शक कारभार करावा त्याचबरोबर संस्थेच्या कारभारावर एकही तक्रार खपवून घेतली जाणार नाही. याची नोंद घेऊन तक्रारदारावर योग्य ती कारवाई नवनिर्वाचित संचालक मंडळाने करावी असेही निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाकर कांबळे यांनी आपल्या मार्गदर्शन भाषणात सांगितले व नवनिर्वाचित संचालक मंडळाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा