मुंबई ( प्रतिनिधी ) दैनिक बाळकडू ,मुंबई विभागाचे पत्रकार संजय लिमकर दिनांक १५ डिसेंबर २०२४ रोजी बदलापूर येथे नातेवाईकांच्या लग्नास गेले होते तेथून घरी परत येताना बदलापूर रेल्वे फलाट क्रमांक २ येथून वेळ रात्री २१:३७ वा. ची मुंबई कडे येण्यासाठी (सी एस एम.टी) लोकल पकडताना पत्रकारास धक्का - बुक्की करून रक्तबंबाळ केले त्याची तक्रार कल्याण लोहमार्ग पोलीस ठाणे येथे केली असून उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांची रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण येथे वैद्यकीय तपासणी केली असून दोन ते तीन अनोळखी इसम साधारण उंची अंदाजे पाच ते पावणे सहा उंच अंगाने जाडजूड आणि भारदस्त वय वर्षे अंदाजे ३५ ते ४५ अश्या अनोळखी इसमांच्या मारहाणीत पत्रकार संजय लिमकर यांना जबरदस्त मार लागलेला असून मारहाण केलेल्या त्या अनोळखी व्यक्तीनां बदलापूर रेल्वे स्टेशन सी सी टी व्ही फुटेजच्या मार्फत त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर
योग्य ती कारवाई करून पत्रकाराला न्याय मिळवून देण्यात यावा अशी मागणी पत्रकार संघाने आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा