आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, १५ डिसेंबर, २०२४

विज्ञान प्रदर्शनात श्री समर्थ विद्यालयाचे यश

मुंबई( गणेश हिरवे)जोगेश्वरी (पूर्व )बांद्रेकरवाडी येथील श्री समर्थ शाळेच्या विज्ञान प्रकल्पाची निवड जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी झाली आहे.समर्थ शाळेने के/पी पूर्व विभाग अंतर्गत डिवाईन चाईल्ड हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या वॉर्ड स्तरीय विज्ञान प्रदर्शनात लहान गटात सोलर कॅप हा प्रकल्प सादर केला होता त्याला नुकताच प्रथम क्रमांक मिळाला असून त्याची जिल्ह्यासाठी निवड झाली आहे.शाळेतील विज्ञान शिक्षिका अंजली राणे यांच्या मार्गदर्शनाखाली रिजवान शेख आणि किरतकर्वे गौरव या विद्यार्थ्यानी प्रकल्पाचे यशस्वी सादरीकरण केले होते.शाळेचे ट्रस्टी डॉ महादेव वळंजू, संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक मधुकर पोर्लेकर, शिक्षक शिक्षकेतर यांनी विजेत्या सर्वांचेच अभिनंदन केलं असून विद्यार्थी आणि शिक्षिका यांचा अभिमान असल्याचे नमूद केलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

युवांसाठी प्रेरणादाई असलेल्या श्रीमती आयएएस त्रुप्ती धोडमिसे 'युथ आयकॉन अवॉर्ड २०२५' ने सन्मानित

मुंबई (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर) सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित कार्यक्रमात कोकण एनजीओ इंडिया तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आय...